
आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे सुप्रसिद्ध वचन प्रत्येकाच्या कानी निश्चितच पडलेले असेल आणि मागील काही वर्षापासून आपल्या सर्वांना वचनाची प्रत्यक्ष अनुभूती देखील मिळाली असेल. खरंतर आजमितिला आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची आवश्यकता सर्वार्थाने निश्चितच आहे. तथापि, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही संकल्पना निश्चितच माहित असायला हव्यात.
फ्री लूक कालावधी
तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की पॉलिसीच्या अटी व शर्ती तुमच्या गरजा पूर्ण करत नाहीत किंवा तुम्ही कव्हरबाबत आनंदी नाहीत? असा मुळीच विचार करु नका की तुमचा निर्णय चुकला आहे. सुदैवाने, तुमच्याकडे पॉलिसी रद्द करण्याचा आणि तुमच्या प्रीमियमचा रिफंड मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यालाच फ्री लुक कालावधी म्हटले जाते. बहुतांश इन्श्युरर पॉलिसी डॉक्युमेंट प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 किंवा 30 दिवसांचा फ्री लुक कालावधी प्रदान करतात. ज्यादरम्यान तुमच्याकडे तुमची नवीन इन्श्युरन्स पॉलिसी कॅन्सल किंवा बंद करण्याचा तसेच पॉलिसी पेमेंट रिफंड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर तपशीलवारपणे पॉलिसी डॉक्युमेंट पाहण्याची शिफारस केली जाते. जेणेकरून तुम्हाला पॉलिसी कव्हरबद्दल चांगले माहिती मिळेल आणि जर तुम्ही अटींबाबत समाधानी नसाल तर तुम्ही फ्री लुक कालावधीचा लाभ घेऊ शकता.
ग्रेस कालावधी
जर तुमची पॉलिसी वेळेवर रिन्यू न केल्यास काय होईल? टर्म कव्हर दरम्यानच्या तुमच्या सर्व लाभांवर पाणी सोडावे लागेल का? तुम्हाला नवीन पॉलिसी खरेदी करावी लागेल का?
जर तुमच्या मनात अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांचे चक्रव्यूव्ह असल्यास चिंता करू नका. बहुतांश इन्श्युरर 15 दिवसांचा ग्रेस कालावधी ऑफर करतात. ज्या दरम्यान तुमच्या पॉलिसीची देय तारीख चुकली जरी असल्यास, पॉलिसी रिन्यू करू शकता. तथापि, तुम्ही तुमची पॉलिसी वेळेवर रिन्यू करावी. जर काही कारणास्तव तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू न करू शकल्यास ग्रेस कालावधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. मात्र, तुम्ही ब्रेक-इन-कालावधी दरम्यान तुम्ही कोणताही क्लेम केलेला नसावा.
कपातयोग्य
कपातयोग्य म्हणजे तुमचा इन्श्युरर तुम्हाला नुकसानासाठी भरपाई देण्यापूर्वी तुम्हाला भरावयाच्या क्लेमची रक्कम. तुम्हाला ठराविक पॉईंटपर्यंत खर्चाचा भार सहन करावा लागेल आणि कपातयोग्य थ्रेशोल्ड ओलांडल्यानंतरच इन्श्युरर क्लेम भरेल. समजा तुमच्या पॉलिसीमधील कपातयोग्य रक्कम ₹ 2,000 आहे आणि तुमची स्वीकार्य क्लेमची रक्कम ₹ 15,000 आहे, म्हणजे तुमचा इन्श्युरर तुम्हाला नुकसानासाठी ₹ 13,000 भरेल, परंतु सर्वप्रथम तुम्हाला प्रारंभिक रक्कम ₹ 2,000. भरावी लागेल. कपातयोग्य हे इन्श्युरन्स प्रीमियमच्या व्यस्तपणे प्रमाणात असते, कपातयोग्य जेवढे जास्त, प्रीमियम कमी असते. कपातयोग्य प्रीमियम कमी करण्यास मदत करत असले तरी, तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे की नंतरच्या टप्प्यात क्लेमचा भाग सहन करण्याचा खर्च येतो आणि तुम्हाला त्याविषयी सावधगिरी असणे आवश्यक आहे.
को-पे क्लॉज
जेव्हा पॉलिसीधारक वैद्यकीय खर्चाच्या काही टक्केवारीसाठी देय करण्यास सहमत असतो. तेव्हा ते को-पे म्हणून संदर्भित केले जाते. जर तुमच्या पॉलिसीमध्ये को-पे क्लॉज असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या खिशातून खर्चाचा काही भाग सहन करण्यास सहमत आहात, हे सामान्यपणे टक्केवारीत नमूद केले जाते. उदाहरणार्थ, जर तुमच्या पॉलिसीमध्ये 10% च्या को-पे क्लॉज असेल. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वीकार्य खर्चाच्या 10% साठी देय कराल आणि तुमचा इन्श्युरर उर्वरित 90% देईल. या उदाहरणार्थ, समजा तुम्ही उपचार घेतले आहे आणि एकूण खर्च ₹ 30,000 आहे; याचा अर्थ असा की तुम्ही ₹ 3,000 देय कराल आणि तुमचा इन्श्युरर उपचारांसाठी ₹ 27,000 देय करेल. वजावटी सारखे, को-पे प्रीमियम खर्च कमी करण्यास देखील मदत करते. तथापि, को-पे आणि कपातयोग्य यामध्ये मोठा फरक आहे. कपातयोग्य थ्रेशोल्ड मर्यादा ओलांडल्यानंतर, इन्श्युरर संपूर्ण उर्वरित रक्कम भरतो. को-पे ही एक निश्चित रक्कम आहे जी पॉलिसीमध्ये संपूर्ण क्लेमसाठी इन्श्युअर्ड व्यक्ती सोसावी लागेल.
कपातयोग्य किंवा को-पे हे काही देशांमध्ये सेल्फ-इन्श्युरन्स म्हणून लोकप्रिय आहे.
हेल्थ इन्श्युरन्स मधील संचयी बोनस
संचयी बोनसला ‘सीबी’ म्हणूनही ओळखले जाते. तुमचा इन्श्युरर तुम्हाला क्लेम-फ्री वर्षासाठी हा रिवॉर्ड प्रदान करतो. प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी बोनस एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जमा होतो. इन्श्युरर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय जास्त सम इन्श्युअर्डच्या स्वरूपात वाढीव कव्हरसह रिवॉर्ड देतो. उदाहरणार्थ, जर इन्श्युरर पहिल्या क्लेम-फ्री वर्षासाठी 5% संचयी बोनस ऑफर करीत असेल तर ₹ 20,00,000 ची सम इन्श्युअर्ड ₹ 21,00,000 पर्यंत वाढेल, दुसऱ्या क्लेम फ्री वर्षासाठी ₹ 22,00,000 आणि अशा प्रकारे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही क्लेम केला तर तुमचा बोनस त्याच दराने कमी केला जाईल ज्यावर तो जमा झाला होता. इन्श्युरन्स रक्कम वाढविण्यासाठी कोणतेही निश्चित, वर्षानिहाय स्लॅब नाहीत आणि इन्श्युरर निहाय आणि उत्पादनानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो. सीबीच्या अटी पॉलिसी वैशिष्ट्यांमध्ये नमूद केल्या आहेत आणि तुम्ही पात्र असलेले लाभ समजून घेण्यासाठी तुम्ही तपशीलवार त्या बाबत माहिती जाणून घ्यावी. सीबी मुळे वाढत्या वैद्यकीय महागाईवर मात करणं शक्य ठरतं. तुम्हाला आश्वासित रक्कम वर्षभरात वाढवण्याची गरज नाही. त्यामुळे, आता तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संबंधित महत्वपूर्ण संकल्पनांची माहिती मिळाली आहे. मला खात्री आहे की, तुम्हाला तुमची पॉलिसी खरेदी करताना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेणं निश्चितच शक्य ठरेल.
लेखक : भास्कर नेरुरकर, प्रमुख – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
Leave a Reply