‘गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस

 

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक गेम्स मधील नेमबाजीत कांस्य पदक पटकावले. गोकुळ परिवाराच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी कांबळवाडी येथील त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे अभिनंदन केले.यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले पॅरिस ऑलिम्पिक मधील नेमबाजी मध्ये स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक मिळवून तालुका, जिल्हा, राज्य तसेच देशाचा नावलौकिक केला असून त्याचा गोकुळ परिवाराला अभिमान आहे. गोकुळने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून स्वप्निलच्या या यशाबद्दल त्याला गोकुळमार्फत १ लाख रुपये बक्षीस म्हणून जाहीर केले. त्याचा व कुटुंबियांचा गोकुळमार्फत यथोचीत सत्कार करून चेक प्रधान कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वप्निल चे वडील सुरेश कुसाळे व आई सौ.अनिता कुसाळे यांनी स्वप्निलच्या या यशस्वी वाटचालीची माहिती दिली.ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, अभिजित तायशेटे, किसन चौगले, बी.आर.पाटील (आवळीकर), जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,संग्राम मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!