
कोल्हापूर /प्रतिनिधी : डॉक्टर प्रांजली धामणे यांच्या कोल्हापुरातील ‘आरोग्यती’ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये सुपर इंडक्टिव्ह सिस्टम या अत्याधुनिक उपचार प्रणालीचे अनावरण डॉ.अमित धुमाळे (डायरेक्टर जुपिटर रिहबिलिटेशन सेंटर ठाणे) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. संदीप पाटील व डॉ. मनीषा जैन उपस्थित होते.
डॉ. प्रांजली धामणे या गेल्या 25 वर्षापासून फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी अनेकविध जर्मन तंत्रज्ञानाने प्रगत सुविधा सेंटरमध्ये आणल्या आहेत. सन 1997 साली शासकीय महाविद्यालय नागपूर येथून पदवी घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.तसेच सन 1998 पासून कोल्हापुरात सेवा देण्यास सुरुवात केली, सुरुवातीला रोटरी फिजिओथेरपी सेंटर व कोल्हापुरातील नामांकित डॉक्टरांसोबत काम करत असताना त्यांनी सन 2007 साली स्वतःचे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केले.
यावेळी डॉ. मनीषा जैन यांनी बोलताना सेंटरमध्ये रुग्णांवर करण्यात येणाऱ्या फिजीओथेरपी विषयी माहिती दिली आणि सेंटरच्या भविष्यातील मोबाईल व्हॅन आणि सुसज्ज रिहॅबिलिटेशन सेंटरची सेवा एकाच छताखाली देण्याची योजना बोलून दाखवली.यावेळी सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेवेविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली.
Leave a Reply