
कोल्हापूर/ प्रतिनिधी: उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक ऑफ इन्स्टिट्यूट (एनआयटी) शाखेचे नुकतेच मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी मान्यवरांच्या उपस्थितीत एनआयटीच्या लोगोचे देखील अनावरण करण्यात आले. बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता छत्रपती शाहू महाराजांनी वसतिगृहे स्थापन केली. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. नुकतेच दिल्लीच्या संस्थेकडून एनआयटीला पदवी अभियांत्रिकी कोर्सेसना मान्यता मिळालेली आहे. बहुजन समाजाच्या हितासाठी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या संस्थेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञानानुसार अभियांत्रिकी शिक्षण द्यावे,असे प्रतिपादन मालोजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणात केले.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एनआयटी शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे तसेच आमदार जयंत आसगावकर, , गोवा व महाराष्ट्र सर्कल अध्यक्ष डॉ. रणजित सावंत प्रमुख उपस्थित होते.
संस्थेचा शाखा विस्तार वेगाने होत असताना अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असा विश्वास आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केला.
संस्थेची गुणवत्ता अधिक अधिक वाढत असल्यामुळेच संस्थेला पदवी अभ्यासक्रमाची मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी केले.
प्राचार्य संजय दाभोळे यांनी न्यू पॉलिटेक्निक ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पर्यंत या संस्थेचा प्रवास कसा झाला याबद्दल आपल्या प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली. चेअरमन डॉ. के.जी पाटील यांचा वाढदिवस यावेळी केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास खजानिस वाय. एस. चव्हाण, विक्रम गवळी यांच्यासह संस्थेचे कर्मचारी प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन पाटील यांनी आभार मानले. शेवटी प्रा. शामल चव्हाण यांनी वंदे मातरम गायन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply