कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा खेळीमेळीत

 

कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे aउद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.येथील वाय. पी. पोवारनगरमधील उद्यम सांस्कृतिक सभागृहात कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी आमदार जाधव अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि येथील उद्योजक सक्षम बनला पाहिजे या उद्देशाने कोल्हापूर उद्यम सोसायटी काम करीत आहे. लघु उद्योजक सभासदांना औद्योगिक कारणासाठी जागा पुरविणे, लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्यम सोसायटीचा मुख्य हेतू आहे. यानुसारच टोप संभापूर येथे सोसायटीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. येथील विजेचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून, वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन उभारणीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधी मंजुर करून आणला. या निधीतून सबस्टेशनच्या बांधकामास सुरुवात झाले. हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे. याचबरोबर इंटरनल लाईट पोल उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे या कामाचे इस्टिमेट व ड्रॉइंगचे काम पूर्ण झाले असून, या कामाची टेंडर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक वसाहत मधील कच्चे रस्ते आणि घुणकी ते संभापूर येथील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. संभापूर येथील पाण्याची टाकी व जल शुध्दीकरण केंद्राचे काम हे पूर्ण झाले आहे. यामुळे या ठिकाणी जागा घेतलेल्या सभासदांनी उद्योग उभारणीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी.

‘संस्थेने औद्योगिक मंदी असतानाही चांगले काम केले आहे. सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगले काम करता आले असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विषय पत्रिकेमधील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजन सातपुते, संचालक हिंदुराव कामते, संगीता नलवडे, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अशोक जाधव, माणिक सातवेकर, भरत जाधव, सुधाकर सुतार, कुशल सामाणी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व उद्योजक कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष राजन सातपुते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!