महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांची विचारधारा: राहुल गांधी

 

कोल्हापूर /प्रतिनिधी: शिवाजी महाराजांची विचारांची धारा ही महाराष्ट्राच्या मातीतूनच त्यांच्यामध्ये रुजलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीतच शिवाजी महाराजांचे विचार रुजलेले आहेत. असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, संसद सदस्य व काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी आज केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण आज कसबा बावडा भगवा चौक येथे त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही पुतळ्याचे अनावरण करताना आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्याचवेळी आपण त्या व्यक्तीच्या विचारांचे, कर्माचे समर्थन करत असतो. ज्या विचारांनी त्यांनी आयुष्य वेचले त्याच विचारधारेने आपण आपले आयुष्य जगले पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा संदेश शिवाजी महाराजांनी देशाला समाजाला दिला. पण आरएसएस आणि भाजप यांची विचारधारा ही विरुद्ध आहे. पुतळ्यासमोर ते नतमस्तक होतात. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध विचारधारेने काम करतात. म्हणून पुतळे पडतात. अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. तसेच संविधानात शिवाजी महाराजांचे विचार सामावलेले आहेत. हे संविधान आता वाचवण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी केले. आज भारतात दोन विचारांची लढाई सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या काळात पुढे घेऊन जाणे म्हणजे संविधानासोबत उभे राहणे आणि सर्वसमावेशक न्यायासाठी प्रयत्न करणे” अशी भूमिका मांडली.

हा भव्य पुतळा शौर्य, न्याय आणि स्वाभिमान या तत्वांची आपल्या सर्वांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहणार आहे. तसेच तुमच्या मनातले, जनतेला न्याय देणारे सरकार यावेळी सत्तेवर येणार आहे. असे आमदार सतेज पाटील म्हणाले.
याप्रसंगी शाहू छत्रपती महाराज, रमेश चेन्निथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. संजय डी. पाटील, मालोजीराजे छत्रपती आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रजनीताई पाटील, आ.प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पी. एन. पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!