
कोल्हापूर : देशभक्ती पर उत्साही वातावरणात राष्ट्र सेविका समितीचे संपूर्ण गणवेशात, सघोष पथ संचलन उत्साहात संपन्न झाले.रविवारी सकाळी प्रायव्हेट हायस्कूल मधून या संचलनाची सुरुवात झाली.पीटीएम गल्ली – कोळेकर तिकटी -सणगर गल्ली – खरी कॉर्नर – मिरजकर तिकटी- भारत डेअरी – मार्गे पुन्हा प्रायव्हेट हायस्कूल मध्ये संचलनाची सांगता झाली.यानंतर तेथेच विजयादशमीचा उत्सव पार पडला.अधिकाऱ्यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.या उत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी गडहिंग्लज येथील प्राध्यापक श्रो. दत्ता देशपांडे हे उपस्थित होते.वंदे मातरम या प्रेरक गिता संदर्भात बोलताना त्यांनी वंदे मातरम या गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व विशद केले.त्या काळी या स्फूर्तिदायक गीताने भारून जाऊन असंख्य लोकांनी आपले सर्वस्व मात्रृभूमीसाठी अर्पण केले.समितीच्या सेविकाही आपल्या भारतमातेच्या उन्नतीसाठी स्त्रियांच्या संघटनाचे काम करीत आहे.सेविकानी कायम मनात ‘ वंदे मातरम्’हा भाव जागृत ठेऊन समाजमन सुदृढ, सुसंस्कारित होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply