आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

 

कोल्हापूर: शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याने शिक्षकांचा सत्कार आपल्या हातून होणे हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहा उपक्रमशिल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शनिवारी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने कोल्हापूर शहरातील १० मान्यवर शिक्षकांचा सत्कार अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि प्रायव्हेट हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक. प्रवचनकार दीपक भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. देशाची भावी पिढी घडवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. गीता कोरवी, संगीता जगदाळे, कल्पना जगदाळे, कुसुम पांढरबळे, वर्षा येझरे, सीमा खोत, रेश्मा आरवाडे, महेश उपाध्ये, इंद्रजीत भोसले, मनोहर पवार या शिक्षकांना सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र घेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सौ. महाडिक यांनी शिक्षक वर्गाबद्दल गौरवोद्गार काढले. शाळकरी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असें सांगत सौ. महाडिक यांनी आपल्या हातून गुरुजनांचा सत्कार होतोय. हा आपल्यासाठी भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे नमूद केले. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण आणि शिक्षक आवश्यक असले तरी मुलांच्या आवडीचा शिक्षक बनणे कठीण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाचनामुळे मन समृद्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी. असे प्रतिपादन भागवत यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे बाळकृष्ण शिंपुगडे, राहुल पाटील, राजशेखर सनबर्गी, भाग्यश्री देशपांडे, अमोल देशपांडे, प्रतिभा शिंपुगडे, जगदीश चव्हाण, अनिता जनवाडकर, मोहन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!