
कोल्हापूर / प्रतिनिधी : शिवाजी उद्यम नगर, गणपती मंदिर शेजारील दृश्यम आय केअर सेंटरमध्ये नुकतीच एक डोळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अतिजाड भिंगाचा चष्मा घालवण्यासाठी लॉसिक किंवा लेझर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. परंतु काही रुग्णांना या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेली शस्त्रक्रिया काही कारणामुळे करता येऊ शकत नाही. बुभूळाची जाडी कमी असलेल्या रुग्णांना चष्म्यातून मुक्त होण्यासाठी वेगळ्या प्रकारची आधुनिक शस्त्रक्रिया केली जाते. अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान दृश्यम आय केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहे.अशी माहिती नेत्ररोग तज्ञ डॉ. सायली गुळवणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करताना लेन्सचा अचूक नंबर काढावा लागतो. आणि ती लेन्स डोळ्यांमध्ये बसवली जाते. यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. परंतु अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे हे जोखमीचे आणि क्लिष्ट काम आहे. पण ही शस्त्रक्रिया दृश्यम आय केअर सेंटरमध्ये यशस्वीपणे पार पडली. हे अनोखे तंत्रज्ञान आत्ता कोल्हापुरात प्रथमच या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. असे देखील डॉ. गुळवणी यांनी सांगितले. तसेच दृश्यम आय कार्ड रुग्णांसाठी उपलब्ध करत आहोत. यामध्ये फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी या सर्व सुविधांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ. सायली गुळवणी यांनी केले. पत्रकार परिषदेस डॉ. निखिल गुळवणी उपस्थित होते.
Leave a Reply