
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील यादववडी,मणेरमळा, उंचगांवातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. 2 कोटी 50 लाखांच्या निधीतून करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्याचे आणि 1 कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या विद्या मंदिर, यादववाडी या मॉडेल स्कूलचे लोकार्पण आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा सुसज्ज शाळेमुळे भविष्यात सुशिक्षित पिढी घडेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गावातील रस्त्याचे काम पूर्ण होता याचे मला समाधान वाटते तसेच गावातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. तर गावातच त्यांना मॉडर्न स्कूलद्वारे शिक्षण घेता येईल असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले.यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, उद्योजक तेज घाटगे, सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच तुषार पाटील, गटशिक्षणाधिकारी (पं.स. करवीर) समरजीत पाटील, कावजी कदम, सुनील पोवार, प्रवीण केसरकर, अशोकराव निगडे, गोपीशेठ मणेर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय निगडे, सचिन देशमुख, सचिन गाताडे, श्रीधर कदम, वैजयंती कदम, कीर्ती मसुटे, महेश जाधव, रवी काळे, रवींद्र केदार, मुख्याध्यापक ए.के. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. संजना बनसोडे यांच्यासह सर्व आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply