
कोल्हापूर: सव्वादोन वर्षातील कारभार आणि विकासकामे हीच आमची ओळख असल्याचे सांगत महायुती सरकारने आपल्या कारभाराचे प्रगतिपुस्तक मांडले आहे. महायुती सरकारच्या वा रिपोर्ट कार्डची डिपोर्ट कार्ड अशा शब्दांत हेटाळणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असली तरी काही निवडक निकषांवर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचाच कारभार कसा सरस होता, हे आकडेवारीनिशी दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न महायुतीकडून केला गेला आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना या रिपोर्ट कार्डबद्दल माहिती दिली. यामुळे महाविकास आघाडीचौ कोंडी झाली असून विकास आणि प्रगतीचा हा दावा खोडून काढण्यासाठी मविआला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.महाविकास आघाडीने गद्दारांचा पंचनामा नामक एक पुस्तिका जाहीर करीत महायुतीच्या कारभाराची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे खंडन करण्यासाठी महायुतीने रिपोर्ट कार्ड जारी केला आहे. महायुती सरकारने आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये तुलनात्मचा आखडेवारी सादर करत विरोधकांच्या अनेक दाखल्यातील हवा काढून घेतली. महिला सशक्तीकरण, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, ग्रामीण विकास, शहरी क्षेत्रातील पायाभूत विकास अशा दहा आघाड्यांवर महायुती सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाही मांडला. पासोयतय महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि महायुती सरकारच्या सव्वादोन वर्षातील कामगिरीची तुलना केली. दोन्ही सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना मिळालेला मदतनिधी, आलेली परकीय गुंतवणूक अशा दहा मुद्यांच्या कामगिरीचा आढावा मांडला. या सर्व क्षेत्रांतील आकडेवारीच समोर आणत महायुतीने आपला कारभार महाविकास आघाडीच्या तुलनेत उत्तम असल्याचे दाखवून दिले. अशी माहिती क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आदित्य ठाकरे यांनी या रिपोर्ट कार्ड वर कडाडून टीका केली होती हे रिपोर्ट कार्ड नसून डीपोर्ट कार्ड आहे. यावर पत्रकारांनी क्षीरसागर यांना प्रश्न विचारला. त्यांच्या बाबतीत सर्वच गोष्टींमध्ये ते निगेटिव्ह गोष्टी शोधतात त्यांना चांगले झालेलं बघवत नाही असे प्रत्युत्तर क्षीरसागर यांनी दिले. येत्या २१ ऑक्टोबर रोजी उमेदवार यादी प्रसिध्द होईल असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply