ग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे

 

कोल्हापूर : ग्रंथ हे जगण्याची प्रेरणा देतात, दिशा दाखवतात. मार्गदर्शन करतात. ग्रंथसोबत ही जगण्यासाठी पूरक ठरते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ मोलाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. येथील करवीर नगर वाचन मंदिरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी विविध लेखक, साहित्यिक त्यांच्या साहित्यकृतींचा समाज आणि नागरिकांवर झालेला परिणाम याची उदाहरणे देत ग्रंथांचे महत्व विशद केले.

वाचन मंदिरच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटामध्ये मेन राजाराम प्रशालेची विद्यार्थिनी पायल दिंगबरे हिने तर खुल्या गटात वृषाली कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ७५ हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिल्याबद्दल यावेळी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण साळाेखे, कार्यवाह अश्विनी वळिवडेकर, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या उपस्थितीत एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन गटामध्ये प्रांजल शहापूरकर, ऋचा तेंडुलकर आणि भक्ती उतरंडे यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. तर खुल्या गटात उत्तम तलवार, सुषमा पाटील, दीपक पाटील यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. या सर्वांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक डॉ .अमर आडके, चंद्रशेखर फडणीस, मंगेश राव, मनीषा वाडीकर, डॉ. विजय पाटणकर, मनीषा शेणई उपस्थित होत्या. विकास कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!