कोल्हापुरात ‘गल्फ ऑइल’च्या वतीने ‘चाय-पकोडा’ बाइक रॅली

 

कोल्हापूर :कोल्हापूरच्या रस्त्यांवर दुचाकीस्वारांची धूम पाहायला मिळाली. ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’ या प्रसिद्ध कंपनीच्या वतीने कोल्हापुरात ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे. या अगोदर गेल्या वर्षी आयोजित केलेल्या ‘चाय पकोडा बाइक रॅली’ला बाइकस्वारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. बाइकस्वारांचा प्रतिसाद लक्षात घेत, यंदाही आयोजकांनी कोल्हापुरात ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे दमदार आयोजन केले. मोठ्या दिमाखात साजरी होणारी ही बाइक रॅली ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’ आणि ‘इंडिया बाइक वीक २०२४’ यांच्या भागीदारीतून आयोजित केली होती. आशिया खंडातील दुचाकीस्वारांचा सर्वात मोठा फेस्टिवल म्हणून ‘इंडिया बाइक वीक’कडे पाहिले जाते. या फेस्टिवलला ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’च्या वतीने सलग दुसऱ्यांदा प्रयोजिकत्व दिले आहे. कोल्हापूरच्या बाइक रॅलीत कडकडीत चहा आणि गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत, मोठ्या संख्येने दुचाकीस्वारांचे बाइकप्रेम, धाडस आणि सौहार्द पाहायला मिळाले,कोल्हापुरातील प्रसिद्ध केएसबीपी उद्यानाजवळील बायकर्स चौक येथे बाइक रॅलीला सुरुवात झाली होती. मोकळ्या रस्त्यातून तब्बल २३ किलोमीटरपर्यंत बाइकस्वारांनी धूम केली. माधळे येथील प्रसिद्ध ‘माउंटन व्यूव्ह रिसॉर्ट’ येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आयोजकांकडून दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. रॅली सुरू होण्यापूर्वीच सर्व बाइकस्वावारांना सुरक्षिततेबाबतचे मूलभूत प्रशिक्षण दिले गेले. रॅलीदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये, नियोजित कार्यक्रमाचे योग्य समन्वय साधले जावे, यासाठी ‘इंडियन बायकर्स वीक’ च्या प्रमुखांनी रॅलीचे नेतृत्व केले. ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’च्या वतीने सर्व बाइकस्वारांना सुरक्षित जॅकेट पुरविले गेले. रॅली व्यवस्थित पार पडल्यानंतर कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी विविध खेळांचे आयोजन केले गेले. पुश अप्स आणि व्यायामाच्या विविध स्पर्धामध्ये दुचाकीस्वार मोठ्या हिरिरीने सहभाग घेत होते. बाइक रॅली कार्यक्रमाबद्दल माहिती देताना ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी चावला म्हणाले की, “यंदाच्या वर्षात आम्ही पुन्हा ‘चाय पकोडा बाइक रॅली’चे आयोजन केले. यंदाही इंडियन बायकर्स वीकसोबत आमची भागीदारी होती . भारतातील दुचाकीस्वार समूहांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकीस्वारांमधील धाडसी प्रवृत्ती, तसेच एकमेकांबद्दल बंधुता टिकून राहावी, त्यांना मोकळ्या रस्त्यांवर दुचाकीचा मनमुराद आनंद लुटता यावा, या हेतूखातर आम्ही रॅलीचे आयोजन करतो. जगभरात बाइक संस्कृती बहरली जावी, याकरिता आम्ही अशा उपक्रमांचे आयोजन करतो.”‘इंडियन बायकर्स वीक’च्या वतीने देशभरातील विविध भागात बाइक रॅलींचे आयोजन केले जात आहे. कोल्हापुरात झालेल्या बाइक रॅलीमध्ये दुचाकीस्वारांचा एकमेकांशी संपर्क वाढतोय, अनुभव द्विगुणित होतोय. वळणावळणाच्या रस्त्यातून निसर्गाचा आनंद घेत सोबत चहा आणि गरमागरम भज्यांचा आनंद लुटत ‘चाय पकोडा रॅली’ यंदाही यशस्वी ठरली , ही रॅली सर्वांच्या मनात अविस्मरणीय आठवण देऊन गेली, असे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!