
सांगली : उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लहान मुलांची शस्त्रक्रिया आणि त्वचारोग विभागाचे उद्घाटन मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मिलिंद परीख आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय कोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 28 हून अधिक स्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी विभाग आहेत. त्यामध्ये या दोन नवीन विभागांची भर पडली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तसेच त्वचारोगांवर उपचाराची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.मुंबईच्या जेजे हॉस्पिटल येथून शिक्षण घेतलेले डॉ. संतोष पाटील हे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणार आहेत. त्यांनी सांगली आणि कोल्हापूर परिसरात गेली २५ वर्षे प्रॅक्टिस केली आहे. ४० हजारहून अधिक नवजात अर्भकातील दोष, पिडियाट्रिक लॅप्रोस्कोपी, ब्रोंकॉस्कोपीसह लहान मुलांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
उषःकालच्या त्वचारोग विभागामध्ये त्वचारोग, केसांच्या समस्यांवर उपचार, तसेच सौंदर्यशास्त्र आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या विभागाच्या प्रमुख डॉ. आदिती सुरवसे-पाटील यांनी मुंबईच्या सायन हॉस्पिटल येथून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना मुंबई, ठाणे व नाशिक परिसरातील दहा वर्षांचा अनुभव आहे.
यावेळी दोन्ही विभागांना शुभेच्छा देताना डॉ. मिलिंद परीख म्हणाले, अधिकाधिक स्पेशलिटी आणि सुपर स्पेशलिटी तज्ज्ञ डॉक्टर व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागातील शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत होतील. या सर्व सुविधांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी डॉ. आनंद मालानी, डॉ. मकरंद खोचीकर, डॉ सतीश देसाई, डॉ. विनायक पत्की आदी डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होते.
Leave a Reply