विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित :आमदार ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात उचगावसह दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. या विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर परिसरातील संपर्क सभेत ते बोलत होते.आ.ऋतुराज पाटील म्हणाले, उंचगावचे माझ्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. मंगेश्वराच्या साक्षीने ‘दक्षिण’ मोहीमेची सुरुवात करत आहे. ही मोहीम तुमची आमची सगळ्यांची आहे. भविष्यातही ऋतुराज पाटील आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहील.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजु यादव म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. या जोरावरच ते दक्षिण मतदारसंघात बाजी मारतील.डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उचगावमधील शेकडो लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांनी या हॉस्पीटलच्या माध्यमातून गोरगरीबांना मोठा आधार दिल्याचे उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केलं.अश्विनी चव्हाण यांनी आ.ऋतुराज पाटील यांचा विजय हीच आम्हां बहिणींची ओवाळणी आहे.श्रेयस कदम, दीपक रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच तुषार पाटील, माजी सरपंच गणेश काळे, दादू चौगुले, जि. प.च्या माजी सदस्या मंगल वळकुंजे, कावजी बापू, पं. स. च्या माजी सदस्या पूनम जाधव, मल्लू माळी, बाळासो बोचके, धुळाप्पाना वळकुंजे, वैभव पाटील, माणिक पाटील, विराग करी, संजय चौगले, बबन जाधव, गोपी मणेर, पांडू माने, शिवाजी निगडे, दशरथ चौगुले, संभाजी यादव, दीपक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :
उचगाव : येथे आयोजित संपर्क सभेत बोलताना आमदार ऋतुराज पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!