
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. सदरची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दि.२० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक यांनी बोरवडे,लिंगनूर,तावरेवाडी,गोगवे,शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि.०९/११/२०२४ इ. रोजी अखेर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले आहे.
Leave a Reply