
कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पी. एन. पाटील- सडोलीकर यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदर शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या तसेच शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळे येथे जाहीर सभा झाली.यावेळी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांच्या माघारी राहुल पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपली असल्याचे नमूद केले. महाविकास आघाडीची ‘लोकसेवेची पंचसुत्री’ प्रत्यक्षात आणण्यासाठी राहुल पाटील यांना निवडणूकीत विजयी करा या आवाहनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले, पनोरे आणि वारनूळ यासह अनेक गावातील महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीला निर्णायक मताधिक्य मिळणार हे आजच्या गर्दीने दिसून आले.यावेळी राजूबाबा खानविलकर, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके तसेच जयसिंगराव हिर्डेकर, राजेश पाटील, बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, बाळासाहेब खाडे, बाबासो देवकर, क्रांतीसिंह पवार, पैलवान संभाजी पाटील यांच्यासह विलास पाटील- कळेकर, ऋतिका काटकर, सरदार पाटील, राजू सूर्यवंशी, सुरेशराव पवार, मनोज पाटील, बाळासाहेब मोळे, वसंत इंजुळकर, शशिकांत आडनाईक, पी. डी. पाटील- आसगांवकर, पांडुरंग पाटील, विलास पाटील- सावर्डेकर, निवास पाटील, भरत मोरे, हंबीरराव चौगुले, दामोदर गुरव, शाहू काटकर, रणधीर पाटील, सुनील पाटील, दादा पाटील, अश्विनी इंजुळकर, रंगराव नाईक, राकेश काळे, याच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply