
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आ.सतेज पाटील तसेच सौ. मधुरिमाराजे छत्रपती व विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये कणेरकरनगर येथे जाहीर सभा पार पडली.आमदार ऋतुराज पाटील यांनी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या गोष्टीसाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे त्यामुळे मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील याची खात्री वाटते. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख आशिष शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सौ. वनिता देठे, अभिजीत चव्हाण, इंद्रजीत बोंद्रे, यांच्यासह टि. एस. पाटील, अभिजीत खतकर, बंडोपंत दळवी, युवराज तेली, नंदु पिसे, कुलदिप सावरतकर, के.पी.जाधव, जे.के. कांबळे, मेघा गावडे, सुनिता वारे, निलम भोपळे, सुनिल वर्मा, अतुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply