
कोल्हापूर: पी.एन.पाटील यांची पुण्याई कार्यकर्त्यांच्या मागे असल्याने राहुल पाटील यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.करवीर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल पी.एन. पाटील- सडोलीकर यांच्या प्रचारार्थ यवलूज येथे सभा पार पडली.पी.एन.पाटील नावाची मोठी एफडी आमच्याकडे आहे. त्यांच्या वैचारिक राजकारणाचा वारसा विधानसभेत पाठवण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करा आणि आपल्या सोईनुसार भुलथापा पसरवणाऱ्या गद्दारांना घरी बसवा असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, डॉ. चेतन नरके यांच्यासह बी.एच. पाटील, राजू सुर्यवंशी संभाजीराव पाटील, उदयानीदेवी साळुंखे, अंबाजी पाटील, बबनराव रानगे, बी.एच.पाटील, जयंत हिर्डेकर, शिवसेनेचे सुरेश पवार, दादु कामिरे, सचिन पाटील, डी. जी. भास्कर, निवास पाटील, बबनराव रानगे, शशिकांत आडनाईक, भरत मोरे, नामदेव मोळे, अंबाजी पाटील, बाजीराव देवाळकर, पांडुरंग पाटील, पै. संभाजी पाटील, अमर पाटील- शिंगणापूर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply