
कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनची २८ वी सात्पाहिक सभा ११ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता वृषाली हॉटेलमध्ये होणार आहे. या सभेसाठी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे पुण्याहून उपस्थित राहणार आहेत. सैन्य दलात ते कार्यरत असताना युध्दामध्ये त्यांना अपंगत्व आलं. मात्र त्यावर मात करून दिव्यांगांसाठी झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. भारत सरकारनं मानाचा पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. तसंच त्यांच्या जीवन प्रवासावर आधारीत चंदू चॅम्पियन हा सिनेमाही नुकताच प्रदर्शित झालाय. त्यानंतर भारत सरकारनं क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कारही त्यांना नुकताच जाहीर केलाय. अशा व्यक्तीचा प्रेरणादायी जीवन प्रवास ऐकण्याची संधी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि इनरव्हिल क्लबनं उपलब्ध केली आहे. त्यामुळं सर्वांनी सहकुटुंब या सभेसाठी उपस्थित रहावे, अशी विनंती रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, सचिव बी.एस. शिंपुकडे आणि क्लब सर्व्हिस डायरेक्टर सचिन लाड यांनी केलंय.कार्यक्रम दिनांक शनिवारी ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता हॉटेल वृषाली, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
Leave a Reply