
कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरांची अग्रणी संघटना गेली २३ वर्षे कार्यरत आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूर व डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांचे अंतरंग गॅस्ट्रोइंटरॉलॉजी (पोटविकार) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी “जीपीकॉन २०२५-गॅस्ट्रोकॉन” ही वैद्यकीय परिषद दि. १९ जानेवारी रोजी रविवारी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यत हॉटेल अयोध्या वृंदावन लॉन येथे आयोजित केली आहे. अशी माहिती अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे, सचिव डॉ.महादेव जोगदंडे, जीपिकॉन सचिव डॉ.पूजा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या परिषदेस कोल्हापूर परिक्षेत्रातील ५०० हून अधिक डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. या परिषदेस पोटविकार तज्ञाकडून डॉ.विवेकानंद कुलकर्णी, डॉ.अदित्य कुलकर्णी, डॉ.दिनेश एक्झमबरम, डॉ.तेजस कुलकर्णी, डॉ. मनीषा कुलकर्णी, डॉ. पराग पपलकर, डॉ.सौरभ गांधी डॉ. हर्षल भोई आदी नामांकित डॉक्टर या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.परिषदेमध्ये पोटविकाराबाबत निदान आधुनिक तपासण्या, आधुनिक उपचार पध्दती, पोट विकार शस्त्रक्रिया, पोटविकार भूल या विषयावर सर्वकर्ष माहिती दिली जाणार आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला व प्रत्येक डॉक्टराना उपयुक्त अशी “बेसिक लाईफ सपोर्ट किंवा जीवन संजीवनी” यांची कार्यशाळा व परिसंवाद घेतला जाणार आहे. तसेच वैद्यकीय व इतर विषयावरील पोस्टर प्रदर्शन भरविले आहे.
या परिषदेचे उद्घाटन रविवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री नामदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत हे मार्गदर्शन करणार आहेत.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूरमार्फत दरवर्षी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार डॉ. शितल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सचिव डॉ.महादेव जोगदंडे, खजिनदार डॉ.गुणाजी नलवडे, डॉ.वर्षा पाटील, डॉ.शिवराज जितकर, डॉ.राजेश सोनवणे, डॉ.दीपक पोवार,डॉ.हरीश नांगरे, डॉ.किशोर निंबाळकर, डॉ,शशिकांत पाटील, डॉ.विनोद घोडगे आदी उपस्थित होते.
Leave a Reply