
कोल्हापूर :काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांचा आज शनिवारी ५३ वा होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. ‘देऊया गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात’ हे ब्रीद घेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी या वाढदिवसाला विधायक रुप देत दातृत्वाचा जागर केला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हशी पळवणे स्पर्धा, बैलगाडी शर्यती, फळे वाटप, रक्तदान शिबिरांसह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील हे आज दुपारी ४ नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Leave a Reply