
कोल्हापूर : तमाम महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना या बरोबरीने केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे प्रतिनिधी म्हणून विविध दवाखाने कार्यरत आहेत त्यांनी शासनाचेच प्रतिनिधी म्हणून त्यांना अत्मियतेने सेवा द्यावी आणि त्यांच्याकडून कोणतीही उणीव व्यक्त होऊ नये तसेच शासनाची प्रतिमा अधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी दक्षतेने कार्यरत राहावे ‘असे आग्रही प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले .उद्यम नगर मधील पंत वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये या दोन्ही योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते .
या योजनेमध्ये आणखीन इतरही उपचाराचा सहभाग व्हावा तसेच विविध दवाखान्याने केलेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आले असून त्याच्या सूचना आल्यानंतर त्यांचा सहभागी ही केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली . प्रांरभी सर्वांचे स्वागत अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी केले धाकटा दवाखाना म्हणून वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलची प्रतिमा या योजनामुळे अधिक ठळक होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही यावेळी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी आरोग्य उपसंचालक दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख तसेच श्रीपाद वालावलकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते .या सोहळ्यात हृदयस्पर्शचे पद्माकर कापसे, माजी नगरसेवक अजित पवार ,डॉक्टर महेश प्रभू , रवींद्र हसुरकर सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार ह भ प बाळासाहेब पवार चोपदार तिवले,राजू मकोटे, डॉ. अविनाश उपाध्ये, रावसाहेब मंगसुळी, राम सरगर, विरेंद्र वणकुद्रे डॉ .आर्यन गुणे व सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वांचे आभार रश्मी कुलकर्णी यांनी मानले.
Leave a Reply