
कोल्हापूर: अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर तनिष्कचा एक्सक्लुसिव्ह वेडिंग सब-ब्रँड रिवाह आपल्या शानदार ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन्ससह येत्या उन्हाळी लग्नसराईसाठी सज्ज आहे. भारतामध्ये लग्नातील विविध परंपरांची सखोल जाण असलेला ब्रँड रिवाह बाय तनिष्क वेगवेगळ्या समुदायांमधील नववधूंसाठी तयार करण्यात आलेल्या दागिन्यांची विशाल श्रेणी प्रस्तुत करत आहे. हळदीपासून मेंदीपर्यंत, संगीतपासून लग्नापर्यंत प्रत्येक फंक्शनला साजेसे दागिने रिवाहमध्ये आहेत. याठिकाणी परंपरांना अनुरूप दागिने आहेत, शिवाय नववधूचे विचार, पसंती आणि शान यांना प्रतिबिंबित करणारे देखील आहेत. रिवाहमध्ये वारसा आणि वैयक्तिक अभिव्यक्ती यांचा मिलाप आहे, जो नववधुंना त्यांचे स्वतःचे ब्रायडल नरेटिव्ह तयार करण्यात मदत करतात. रिवाह बाय तनिष्क लग्नाच्या अनुभवाच्या प्रत्येक पैलूला अजून जास्त सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध आहे, ब्रँड हे सुनिश्चित करतो की लग्नाचा प्रत्येक क्षण शानदार असेल.
भारतातील विविध संस्कृतींना समजून घेत, रिवाह प्रत्येक क्षेत्राला अनुरूप ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन प्रस्तुत करत आहे, ज्यामुळे विविध समुदायांमधील नववधूंची पसंती, गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळेच रिवाह बाय तनिष्क प्रत्येक वेडिंग फंक्शनसाठी सर्वोत्कृष्ट आहे. रिवाहची कलेशन्स स्थानिक परंपरा आणि पसंती यांचा आदर राखतात, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील नथ, महाराष्ट्रातील ठुशी आणि तोडे असे हर प्रकारचे दागिने याठिकाणी तयार केले जातात. अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या या दागिन्यांमध्ये प्रत्येक नववधूला आपली वैयक्तिक शैली व सांस्कृतिक वारसा दिसून येतो, आणि परंपरा व आधुनिक शान यांचा संगम असलेला ब्रँड हे रिवाहचे स्थान अधिक मजबूत होते.अक्षय तृतीया हे नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे, हे कलेक्शन परंपरा, अस्सलपणा, नवेपण आणि दीर्घकालीन मूल्य यांची सांगड घालणाऱ्या दागिन्यांची वाढती मागणी पूर्ण करतो. लग्न हा अतिशय वैयक्तिक सोहळा असतो, आणि मॅरेजेस क्राफ़्टेड बाय यू वैयक्तिक अभिव्यक्तीची भावना दर्शवतो, नववधुंना त्यांच्या परंपरांचा सन्मान करतानाच आधुनिक शान मिळवण्याची संधी देतो. वेडिंग कलेक्शनचे प्रत्येक डिझाईन परंपरा आणि आधुनिकतेची कहाणी सांगतो, आणि रिवाह बाय तनिष्क प्रत्येक नववधूसाठी वारसा म्हणून जपून ठेवता येईल अशी गुंतवणूक बनते.तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्कि त्शेरिंग यांनी सांगितले, “समर वेडिंग सीजनसाठी रिवाह बाय तनिष्कने वारसा आणि आधुनिकता यांची सांगड घालणाऱ्या ब्रायडल ज्वेलरीची वाढती मागणी पूर्ण करणे कायम राखले आहे. अक्षय तृतीयेचा सण या सीजनची सुरुवात दर्शवतो, आमची रिवाह गोल्डन एडवांटेज स्कीम आणि बेस्ट गोल्ड रेटमुळे दरवर्षी २.७ लाख वेडिंग खरेदीदारांना मदत मिळाली आहे. प्रत्येक क्षेत्राला अनुरूप दागिने आणि नैसर्गिक हिऱ्यांप्रती वाढते आकर्षण पाहता, रिवाह आधुनिक नववधूची वैविध्यपूर्ण पसंती पूर्ण करतो. भावनिक मूल्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक दोन्ही लाभ देणाऱ्या दागिन्यांची मागणी वाढत आहे, अशात तनिष्क ब्रँड तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दिवसासाठी अनुरूप, तसेच लग्नातील प्रत्येक फंक्शनला घातले जाऊ शकतील अशा दागिन्यांची सर्वात मोठी कलेक्शन्स प्रस्तुत करणे कायम राखेल आणि तुमच्यासाठी ब्रायडल ज्वेलरी अनुभवाची नवी व्याख्या रचेल.”
सणासुदीसाठीच्या तुमच्या खरेदीचा अनुभव आणखी रोमांचक करण्यासाठी, तनिष्कने सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २०% पर्यंत सूट तसेच सोन्याच्या खरेदीवर प्रति ग्रॅम १०१ रुपये विशेष सूट यासारख्या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ग्राहक आगाऊ बुकिंग करून गोल्ड रेट प्रोटेक्शनचा लाभ घेऊ शकतात आणि सोन्याच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीपासून स्वतःला वाचवू शकतात. याशिवाय, तनिष्कमध्ये, तुम्ही इतर कोणत्याही ज्वेलर्सकडून खरेदी केलेल्या जुन्या सोन्यावर १००% एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकता, या ऑफरसह तनिष्क आपल्या ग्राहकांना विश्वासार्ह, लवचिक आणि स्मार्ट सोने खरेदीची सुवर्ण संधी देत आहे!तनिष्कने नववधुंना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे की त्यांनी रिवाहच्या अतुलनीय कारीगरीचा अनुभव अवश्य घ्यावा. आपल्या जवळच्या तनिष्क स्टोरमध्ये या किंवा ऑनलाईन पहा आणि मॅरेजेस क्राफ़्टेड बाय यू चा आनंद साजरा करणारे सर्वोत्कृष्ट दागिने मिळवा.
Leave a Reply