टॅली सोल्‍यूशन्‍सकडून टॅलीप्राइम ६.० लाँच, कनेक्‍टेड बँकिंगसह एसएमईंसाठी आर्थिक क्रांती 

 

कोल्हापूर: टॅली सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्‍या व्‍यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता कंपनीने त्‍यांचे नवीन रीलीज टॅलीप्राइम ६.० लाँच केले आहे, जे स्‍मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज (एसएमई)करिता आर्थिक कार्यसंचालने सोपी करण्‍यासाठी, तसेच कनेक्‍टेड बँकिंग अनुभवाच्‍या माध्‍यमातून विनासायास करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या प्रगत अपग्रेडने व्‍यवसाय व अकाऊंटण्‍ट्ससाठी बँक रिकन्सिलिएशन, बँकिंग ऑटोमेशन आणि आर्थिक व्‍यवस्‍थापनामध्‍ये क्रांती घडवून आणली आहे. ई-इनवॉईसिंग, ई-वेल बिल जनरेशन व जीएसटी कम्‍प्‍लायन्‍स अशा कनेक्‍टेड सेवा देण्‍यामधील आपल्‍या कौशल्‍याला अधिक दृढ करत टॅलीने एसएमईंना एकीकृत बँकिंग क्षमतांसह सक्षम करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. हे नवीन रीलीज व्‍यवसायांना त्‍यांच्‍या इकोसिस्‍टमशी कनेक्‍ट करण्‍याप्रती, तसेच त्‍यांना अद्वितीय सुलभतेसह ऑपरेट करण्‍यास सक्षम करण्‍याप्रती टॅलीची कटिबद्धता अधिक दृढ करते.
व्‍यवसाय नेटवर्क विनासायास करण्‍याप्रती आपल्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत टॅलीप्राइमचे कनेक्‍टेड बँकिंग वैशिष्‍ट्य टॅलीमध्‍ये बँकांना आणत एकीकरणाला नव्‍या उंचीवर नेते. अकाऊंटिंग व बँकिंगला एकाच सिस्‍टममध्‍ये आणत, तसेच अॅक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँक यांच्‍यासोबत सहयोगांच्‍या माध्‍यमातून सुरक्षित लॉगइन व रिअल-टाइम कनेक्‍ट‍ीव्‍हीटीसह वापरकर्त्‍यांना प्रत्‍यक्ष प्‍लॅटफॉर्ममध्‍ये लाइव्‍ह बँक बॅलेन्‍सेस व व्‍यवहारांबाबत अपडेट्स मिळू शकतात, ज्‍यामधून त्‍यांना त्‍यांच्‍या खेळत्‍या भांडवलाबाबत अपडेटेड माहिती मिळते, तसेच व्‍यवसाय स्‍मार्टर आर्थिक निर्णय घेण्‍यास सक्षम होतात. टॅलीमध्ये पेमेंट प्रक्रिया करण्याची, व्यवहारांचे त्वरित समन्वय साधण्याची आणि बँक बॅलन्सचे निरीक्षण करण्याची क्षमता असल्याने व्‍यवसाय गतिशील राहू शकतात, संसाधनांना ऑप्टिमाइज करू शकतात आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतात.
टॅलीप्राइम ६.० लाँच करताना टॅली सोल्‍यूशन्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. तेजस गोएंका म्‍हणाले, ”आमचे तंत्रज्ञान निर्माण करण्‍याचे नेहमी ध्येय राहिले आहे, जे एसएमईंना व्‍यवसाय कार्यसंचालने सहजपणे करण्‍यास मदत करते. टॅलीप्राइम ६.० सह आम्‍ही प्रत्‍यक्ष टॅली प्‍लॅटफॉर्ममध्‍ये बँकिंगला सम‍ाविष्‍ट करत महत्त्वपूर्ण गरजेची पूर्तता करत आहोत, तसेच व्‍यवसायांना ऑपरेशनल गुंतागूंतींमध्‍ये गोंधळून न जाता विकास आणि इनोव्‍हेशन लक्ष केंद्रित करण्‍यास सक्षम करत आहोत, ज्‍यामुळे त्‍यांचा जवळपास ३० ते ५० टक्‍के वेळ वाचेल. या रीलीजमध्‍ये अनेक इतर वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सुधारित बँक रिकन्सिलिएशन, आर्थिक संस्‍था लिंकेजेसच्‍या माध्‍यमातून खेळत्‍या भांडवलाचे ऑप्टिमायझेशन, ज्‍यामुळे कनेक्‍टेड ई-इनवॉईसिंग आणि ई-वे बिल जनरेशनसह जीएसटी कम्‍प्‍लायन्‍सच्‍या विद्यमान क्षमता अधिक दृढ होत आहेत.”
टॅलीप्राइमचे स्‍मार्ट बँक रिकन्सिलिएशन बँकिंग व्‍यवहारांसोबत आर्थिक रेकॉर्ड्सना विनासायासपणे एकीकृत करत एसएमई व अकाऊंटण्‍ट्सच्‍या बुक्‍सचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये बदल घडवून आणते. जलदपणे रिकन्सिलिएशन, ऑडिट्ससाठी वेळेवर अकाऊंट फायनलायझेशन आणि रिअल-टाइम ऑपरेशनल इनसाइट्स अशा सर्व सेवा युनिफाईड, सर्वोत्तम प्‍लॅटफॉर्मवर उपलब्‍ध आहेत. तसेच, एकीकृत करण्‍यात आलेले यूपीआय पेमेंट्स व पेमेंट लिंक्‍स संकलन सहजपणे करतात, ज्‍यामधून सुलभ रोखप्रवाहाची खात्री मिळते.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत अॅक्सिस बँकेच्‍या ट्रेझरी, मार्केट्स अँड व्‍होलसेल बँकिंग प्रॉडक्‍ट्सचे ग्रुप एक्झिक्‍युटिव्‍ह व प्रमुख नीरज गंभीर म्‍हणाले, ”अॅक्सिस बँक ग्राहकांना विनासायास बँकिंग अनुभव देण्‍यासाठी अग्रगण्‍य सोल्‍यूशन्‍स सादर करत नेहमी इनोव्‍हेशनमध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे. आम्‍ही आर्थिक सोल्‍यूशन्‍समध्‍ये तंत्रज्ञानाला एकीकृत करत एसएमई क्‍लायण्‍ट्सना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. एसएमई बिझनेस बँकिंग लँडस्‍केप झपाट्याने विकसित होत आहे आणि त्‍यांच्‍या सर्व बँकिंग व बँकिंगपलीकडील आवश्‍यकतांसाठी सर्वसमावेशक सोल्‍यूशनची गरज आहे. या ‘कनेक्‍टेड बँकिंग सोल्‍यूशन’सह ग्राहक टॅलीप्राइमध्‍ये बँक अकाऊंट एकीकृत करू शकतात आणि आर्थिक निर्णय घेण्‍यामधील कार्यक्षमता व गतीशीलता सुधारत बँकिंग कार्यसंचालने सुव्‍यवस्थितपणे करू शकतात. हा उपक्रम आमच्‍या क्‍लायण्‍ट्सच्‍या डिजिटल अनुभवाला अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती आमच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांना अधिक पुढे घेऊन जातो.”
टॅलीप्राइम ६.० मध्‍ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, जेथे एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन, मल्‍टी-लेयर्ड अॅक्‍सेस कंट्रोल आणि रिअल-टाइम फ्रॉड डिटेक्‍शन यांचा समावेश आहे. यामधून सुरक्षित बँकिंग व्‍यवहारांची खात्री मिळते. हे लाँच ग्राहकांच्‍या आर्थिक डेटाची परिपूर्ण सुरक्षितता व गोपनीयतेची खात्री घेण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
टॅली प्रगत तंत्रज्ञानासह व्‍यवसाय व्‍यवस्‍थापनामध्‍ये सुधारणा करत आहे, टॅलीप्राइम ६.० च्‍या माध्‍यमातून विनासायास व सर्वांगीण अनुभव देत आहे. कनेक्‍टेड जीएसटी व ई-इनवॉईसिंगपासून व्‍हॉट्सअॅप-बेस्‍ड अलर्ट्स (डब्‍ल्‍यूएबीए), क्‍लाऊड अॅक्‍सेस आणि इंटीग्रेटेड फायनान्सिंगपर्यंत टॅली व्‍यवसायांना सुलभ कार्यसंचालनांसाठी सोप्‍या, कार्यक्षम व कनेक्‍टेड सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!