एनआयटीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग प्रवेश स्क्रूटिनी सेंटर

 

कोल्हापूर:शासनाच्या सीईटी सेलद्वारे राबवल्या जाणाऱ्या डिग्री इंजिनिअरिंग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठीचे अधिकृत स्क्रूटिनी सेंटर उंचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) येथे शासनाकडून मंजूर झाले आहे. अशा स्क्रूटिनी सेंटरमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, प्रवेश फाॅर्म भरून निश्चित करणे, कागदपत्रे पडताळणी करून अपलोड करणे, त्रुटींचे निराकरण, ऑप्शन फाॅर्म भरून निश्चित करणे या सर्व प्रक्रिया मोफत केल्या जातात. शासनाने मुलींना १००% शिक्षण शुल्क माफी दिली असून विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतल्यावरच शासनाच्या सर्व फी शिष्यवृत्ती त्यांना लागू होतात. प्रवेश फॉर्म भरताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यार्थी पालकांनी शासनाने नेमून दिलेल्या स्क्रूटिनी सेंटरमध्ये आपला फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी स्क्रूटिनी सेंटर प्रमुख प्रा. रवि पाईकराव (८७८८१४४४६५) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन एनआयटीचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!