कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करु: खास.धनंजय महाडिक

 

कोल्हापूर::कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी तसेच खेळाडूंना खेळासाठी लागणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्‍वासन, खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. त्यासाठी कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा करावा, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संासद खेल महोत्सवांतर्गत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कागल, मुरगूड या परिसरातील सुमारे १४० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते  करण्यात आले. कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. बॉक्सिंग स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि या खेळात प्रावीण्य मिळवून, शासकीय सेवेत भरती झालेल्या खेळाडूंचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनकडे १ हजार मुले प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. चांगले खेळाडू घडवण्यासाठी कोल्हापूर शहरात चांगली बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी मनोज घाटगे आणि उमेश पाटील यांनी केली. तर मुलांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कोल्हापुरात पहिल्यांदाच सांसद खेल महोत्सवांतर्गत जिल्हा स्तरीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धा घेण्यात येत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

One response to “कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करु: खास.धनंजय महाडिक”

Leave a Reply to gk88slot Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!