कोल्हापूर: कोल्हापूरमधून १७ ध्येयवेडे एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५ (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) मोहिमेसाठी २३ ऑक्टोबर रोजी रवाना झाले होते. यांमध्ये कोल्हापूरमधील नामांकित डॉक्टर, व्यावसायिक, व्यक्ती होत्या.विनोद कांबोज आणि खुशी कांबोज यांनी यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम् चा हा नवा उपक्रम, एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प च्या या प्रवासामध्ये विनोद कांबोज यांच्या सांगण्याप्रमाणे एकूण तीन वेळेला भरतनाट्यम् सादर करण्यात आले. थैंगबोचे मनिस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८, २०० फूट) या ठिकाणी भारतीय शास्त्रीय नृत्य असणाऱ्या भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली गेली..गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील व त्यांच्यासोबत त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या ही सहभागी होत्या. तेंगबोचे येथे चौघींनी गणपती स्तुती सादर केली, त्यानंतर काला पठार येथे शिव श्लोक सादर केला गेला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पहिल्यांदा संयोगिता पाटील यांनी ६ मी चा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला आणि त्यानंतर चौघींनी पावणे सात मिनिटांची भज गोविंदम ही कृष्ण वंदना सादर केली आणि त्याला जोडून सर्वांचे मंगल व्हावे या भावनेने मंगलम् सादर केले.
एवरेस्ट बेस्ट कॅम्प सर करत असताना वाटेमध्ये तापमानामध्ये चढ उतार होत होता आणि गोठवणारी थंडी होती व त्याचबरोबर सलग पाच दिवस झालेली बर्फवृष्टी या सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या पण त्यातून आम्ही पुढे चालत राहिलो. भरतनाट्यम चे पहिले सादरीकरण हे 12687 फूट उंची वरती झाले. यानंतरचा प्रवास हा हळूहळू अतिशय अवघड व जोखमीचा होत गेला. अतिशय कमी तापमानामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता आणि या सगळ्यांमध्ये भरतनाट्यम साठी संपूर्ण तयार होऊन त्या बर्फा मध्ये पायातील बूट काढून नृत्य करायचे होते. दुसरे सादरीकरण हे 17650 फूट उंचीवर झाले. यानंतरचा प्रवास अजूनच अवघड व शर्तीचा झाला. अतिशय कमी म्हणजे -8 अंश तापमानामध्ये आम्हाला नृत्य करायचे होते सर्व मनोबल एकटवून आम्ही 18200 फूट उंची वरती नृत्य सादरीकरण केले. यामध्ये आम्ही मंगलम सुद्धा सादर केले. हे जगामध्ये पहिल्यांदाच झाले आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती नृत्य करण्यामागचा आमचा उद्देश शास्त्रीय नृत्याचे जतन व जगामध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टींमध्ये शांतता निर्माण होऊन सर्वांचे मंगल व्हावे कल्याण व्हावे असा होता. हा अनुभव आमच्या सर्वांसाठीच अविस्मरणीय आहे. अशी माहिती गुरु संयोगिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या प्रवासामध्ये आमच्यासोबत समिट अडवेंचर, कोल्हापूर आणि एबीसी अडवेंचर, नेपाळ यांची सर्व टीम, अॅस्टर आधारचे डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील, त्यांची कन्या सई पाटील, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, न्यायाधीश (निवृत्त) वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आणि उद्योगपती अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील यांनी ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी केली. ही मोहीम गिर्यारोहिका खुशी कांबोज यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाली.

Yo, been playin’ on bettilttr for a bit now. Platform seems smooth enough. Just remember to gamble responsibly, ya heard?