एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या १७ व्या वार्षिक रक्तदान मोहिमेचे ५डिसेंबर २०२५ रोजी आयोजन

 

कोल्हापूर : एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्‍या रक्तदान मोहिमेचे आयोजन त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तनच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतातील ११०० शहरांत ५ ‍डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान करण्यात येणार आहे.या मध्ये एचडीएफसी बँकेचे कर्मचारी, ग्राहक, कॉर्पोरेट्स, संरक्षण क्षेत्रात कार्यरत सदस्य, विद्यार्थी आणि नागरीक सहभागी होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून समाजाच्या कल्याणासाठीची वचनबध्दता अधोरेखित होत असून सातत्याने देशाच्या सुरक्षित आणि वेळेत रक्त उपलब्ध करुन देण्यासाठीचा सहयोग अधोरेखित होत आहे. वार्षिक रक्तदान मोहिम ही बँकेच्या सीएसआर अंतर्गत आयोजित करण्यात येणारा पहिला उपक्रम असून तो बँकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या अंतर्गत आयोजित केला जातो.एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरुचा यांनी सांगितले “ अनेक वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच लक्ष्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत. रक्त दान करणे ही एक सोपी गोष्ट आहे ज्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. आम्ही स्वयंसेवक आणि भागीदारांचे आभारी आहोत जे दरवर्षी या प्रयत्नांना सहकार्य करतात.”एचडीएफसी बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री भावेश झवेरी यांनी सांगितले “ वार्षिक रक्तदान मोहिमेला दरवर्षी अगदी उत्साहाने वाढता प्रतिसाद मिळत असतो कारण आमचे कर्मचारी आणि भागीदार अगदी संघभावनेने वाहून घेऊन काम करत असतात. हा उपक्रम सातत्याने वाढीस लागल्या बद्दल आंम्हाला अभिमान वाटतो आणि आंम्ही नेहमीच देशाच्या आरोग्यव्यवस्थेत आमचे योगदान देण्यास वचनबध्द आहोत. प्रत्येक दाता हा एकत्रित प्रयत्न करुन त्यांचे सक्षम योगदान देत असतो.”दरवर्षी बँके तर्फे प्रतिथयश अशा रक्तपेढ्या आणि आरोग्य संस्थां बरोबर काम करुन सुरक्षित, पारदर्शक आणि वैद्यकीय निकषांचे पालन करुन काम करत असते. या वर्षी या मोहिमेचे आयोजन हे संपूर्ण देशभरांतील प्रतिथयश अशा रक्तपेढ्या, सरकारी विभाग आणि सामाजिक संस्थांबरोबरच्या भागीदारीतून करण्यात येत आहे.ही मोहिम १८ ते ६० वर्षे वयोगटांतील सर्व पात्र निरोगी रक्तदात्यांसाठी खुली आहे. इच्छूक व्यक्ती शिबीराच्या स्थानी भेट देऊन रक्तदान करु शकतात. स्थानां विषयीची संपूर्ण माहिती ही एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटवर त्या तारखेपर्यंत उपलब्ध असेल.ज्या कोणाला या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हायचे आहे ते ५ डिसेंबर २०२५ रोजी शिबीर स्थानी पोहोचावे. त्यानंतर दात्याच्या सुरक्षेसाठी एक छोटी वैद्यकीय चाचणी आणि नोंदणी करुन घेतली जाईल. शिबीराच्या स्थाना विषयीच्या आणि अन्य अधिक माहितीसाठी कृपया एचडीएफसी बँकेची वेबसाईट आणि समाज माध्यमांना भेट द्या.

One response to “एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या १७ व्या वार्षिक रक्तदान मोहिमेचे ५डिसेंबर २०२५ रोजी आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!