कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५ आजपासून सुरू होत आहे ते ८ डिसेंबर पर्यंत प्रदर्शन चालू राहणार आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन,तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.या प्रदर्शनात तीन फुटाची राधा नावाची म्हैस खास आकर्षण असणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब,आमदार सतेज पाटील,आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांची उपस्थिती असणार आहे.तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजक यांनी आवाहन केले आहे. प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.

Acespuer… never heard of it before. Gotta be honest. But I’m always down to try somethin’ new. Anyone else playin’ here? What’s the verdict? Go check it out: acespuer