व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी डॉ.चेतन नरके यांची नियुक्ती

 

कोल्हापूर / प्रतिनिधीमहाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या (एमव्हीसीए) सदस्यपदी डॉ. चेतन नरके यांची सदस्यपदी निवड झाली. पी वाय सी हिंदु जिमखाना पुणे येथे झालेल्या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष रणजित मोरे यांच्यासह संघटक सुधीर कुलकर्णी, खजिनदार कुनाल मोहोळ, पुजा शिंदे, हेमंत किणीकर, विक्रांत मते, सचिन मुळे,रणजित खिरीड यांची निवड झाली.
महाराष्ट्र व्हेटर्नरी क्रिकेट असोसिएशन ही संस्था बीसीआयसीसी संलग्न आहे. जिल्हास्तरावर समिती गठीत केली जाणार आहे. जिल्हास्तरावर स्पर्धाचे आयोजन करुन राज्याचा संघ तयार केला जाईल. देशपातळीवर स्पर्धेतून एक संघ निवडून त्याची स्पर्धा दुबई येथे होणार आहे. यानिमित्तान स्थानिक खेळाडूंना संधी मिळेल. या असोसिएशनमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेट्रॉन आहे.
नियुक्तीनंतर बोलताना डॉ. चेतन नरके यांनी महाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनने मला दिलेल्या या जबाबदारीबद्दल मी कृतज्ञ आहे. माजी खेळाडूंच्या हितासाठी आणि महाराष्ट्रात व्हेटरन क्रिकेटला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.

One response to “व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी डॉ.चेतन नरके यांची नियुक्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!