कोल्हापूर: नुकत्याच रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी वसई विरार ग्रीन पॅराडाईज, मुंबई येथे जेएसटीएआरसी बॅटल ग्राउंड तायक्वांडो चॅम्पियनशिप विरार यांच्या मार्फत भरवण्यात आलेल्या भव्य तायक्वांडो स्पर्धेमध्ये जेएसटीएआरसी मार्शल आर्ट्स स्टुडिओ कोल्हापूर संस्थेच्या 19 विद्यार्थ्यांनी पुमसे व फाईट अशा दोन्ही प्रकारामध्ये एकूण 36 पदके पटकावली त्यातील 15 सुवर्ण 12 रौप्य 6 कास्यपदका सहित पदकांची घवघवीत कमाई करत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकवण्याचा बहुमान मिळवला .या स्पर्धेमध्ये जेएसटीएआरसी कोल्हापूरला *शिप्रा भूने, सई संकपाळ,श्लेषा शेळके, देव चव्हाण, यांनी पुमसे व फाईट अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकासहित सुवर्णपदक पटकावून दुहेरी सुवर्ण मुकुटाचे मानकरी ठरले .
या स्पर्धेमधील विजेते खेळाडू :
पुमसे फाईट
नील भोसले . सुवर्ण रोप्य पदके
मंजिरी शिंदे. सुवर्ण कास्य
मयुरेश शिंदे. कास्य
श्लेषा शेळके. सुवर्ण सुवर्ण
अमोघ अमृता. सुवर्ण रौप्य
गोमती पाटील. रौप्य सुवर्ण
सुमित्रा पाटील. रौप्य
सत्यकाम भोने . सुवर्ण रौप्य
क्षिप्रा भोने . सुवर्ण सुवर्ण
देव चव्हाण. सुवर्ण सुवर्ण
स्पृहा दळवी. सुवर्ण रौप्य
संकेत चौगले रौप्य
तेजस नांबियार. कास्य
अनूप रामचंद्रन रौप्य
सई संकपाळ. सुवर्ण सुवर्ण
जिया बगे. रौप्य कास्य
प्रचिती बिरंजे. रौप्य रौप्य
श्रीहर्ष पुमसे कास्य कास्य
शंतनू भाटवडेकर रौप्य सुवर्ण
वरील सर्व विद्यार्थ्यांना तायक्वांडो प्रशिक्षक अमोल प्रकाश भोसले यांचे प्रशिक्षण लाभले . जीएसटीआरसी सीईओ ग्रँड मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभल.
