नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत, युवा मोर्चाचे संघटन मजबूत करणार : कृष्णराज महाडिक 

 

कोल्हापूर: भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबुत करणार असल्याचे युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.महापौर रूपाराणी निकम यांनी कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेवून भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.रॅलीत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्‍वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, देवराज बारदेस्कर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम, महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्हयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात आगमन झाले. येथे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. एकच चर्चा.. युवा मोर्चा… या घोषणांनी भाजप कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला. दरम्यान कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करताना त्यांना विठ्ठलाची प्रतिमा दिली. यावेळी भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते तानाजी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, नररसेवक विजय जाधव, राजसिंह निंबाळकर, नाथाजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पोवार, रवीश पाटील, प्रशांत बुगले, ऍड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, अनुप देसाई, समयश्री कुमार अय्यर, डॉ. सदानंद राजवर्धन, शंतनू मोहिते, ओमवीर महाडिक, जयेश घरपणकर, अवधुत अपराध, सुधीर राणे यासोबतच मोहळ, सांगोला, पळूज, सिकंदर टाकळी इथले सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकार्‍यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

Comments are closed.

error: Content is protected !!