कोल्हापूर:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला होता.त्यानुसार राधानगरी- ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुणवंतांचा सत्कार. करवीर- मातोश्री वृद्धाश्रमात फळेवाटप व सांगवडे येथे ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप. भुयेवाडी येथे शालेय साहित्य व फळे वाटप. भुदरगड- गारगोटी येथे शालेय साहित्य वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहभोजन. पन्हाळा- बाल संकुलामध्ये धान्य वाटप, कोडोली आरोग्य केंद्रामध्ये फळेवाटप व पोर्ले येथे फळेवाटप. गगनबावडा- कातळी येथे गरजूंना धान्यवाटप, धुंदवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. हातकणंगले- वडगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आरोग्य शिबिर. भेंडवडे येथे शालेय साहित्याचे वाटप. इचलकरंजीतील आय. जी. एम. रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आई वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहजेवण. दक्षिण कोल्हापूर- गडमुडशिंगी येथील हॅंडीकॅप शाळेच्या मुलांना फळेवाटप. गिरगाव येथील राजर्षि शाहू महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप. शिरोळ- ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप, गरजूंना धान्यवाटप व शालेय साहित्य वाटप. शाहूवाडी- बांबवडे येथे वृक्षारोपण. मलकापूर येथील अनाथ आश्रमात फळेवाटप. हा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करा. कुठेही डिजिटल बोर्ड, बॅनर उभा केले नव्हते.वाढदिवसानिमित्त घरोघरी “पी. एम. सूर्यघर योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना” राबविण्याचे संकल्प हाती घेणार आहोत. तसेच उत्तूर ता. आजरा येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तूर येथील कन्या विद्यामंदिर मध्ये पिण्याच्या पाण्याचा जार व खाऊ वाटप करण्यात आला .यावेळी आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे ,जि.प.सदस्य शिरीष देसाई, गणपतराव सांगले , सुधीर सावंत , संजय हत्तीरगे , नजीर लमतुरे,संभाजी आळवेकर , महेश उत्तूरकर , संतोष शिवणे (सर), तानाजी डोंगरे आदी प्रमुख उपस्थित होते.
