कोल्हापूर : पीएनजी ज्वेलर्सचा लाइटवेट ज्वेलरी ब्रँड लाइटस्टाईल बाय पीएनजी चे नवीन स्टोअर कोल्हापूर येथे सुरू झाले असून कमी वजनाच्या सोने व डायमंड ज्वेलरीचा आकर्षक संग्रह कोल्हापूरमधील ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.
शाहूपुरी येथील द नेक्स्टेशन बिल्डिंग, ‘इ’ वॉर्ड, रेल्वे स्टेशन समोर सुरू झालेल्या या स्टोअरमध्ये दैनंदिन वापरासाठी योग्य अशा मिनिमलिस्टिक आणि ट्रेंडी डिझाईन्सची आधुनिक ज्वेलरी उपलब्ध आहे. लाइटस्टाईल कमी वजनाच्या आकर्षक डिझाईन्समुळे दैनंदिन वापरासाठी योग्य आणि स्टायलिश ज्वेलरी ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.या स्टोअरचे भव्य उद्घाटन २२ मार्च २०२६ रोजी पार पडले. उद्घाटन प्रसंगी ग्राहक आणि ज्वेलरी प्रेमींना ब्रँडच्या नवीन आणि ट्रेंडी डिझाईन्सचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर शून्य कपात तसेच अतिरिक्त ३% लाभ देण्यात येत आहे.लाइटस्टाईल बाय पीएनजी महिलांना सुंदर, कमी वजनाच्या आणि दैनंदिन वापरासाठी योग्य अशी दागिन्यांची श्रेणी उपलब्ध करून देत त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. तसेच या नवीन फ्रँचायझी स्टोअरच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.
