कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

कोल्हापूर: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवसनिमित्ताने कोल्हापुरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी हा वाढदिवस संस्मरणीय बनवला. बॅनर, पोस्टर, हारतुरे यावरील खर्च टाळून युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी आज दिवसभरात शिये इथल्या करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊचे वाटप केले. पांजरपोळ संस्थेतील जनावरांना एक ट्रॉली फळे, भाजी, दोन ट्रॉली चारा दिला. सीपीआर चौकात कोल्हापुरी थाळीच्या माध्यमातून अन्नदान, फिरस्त्यांना छत्र्या वाटप आणि नशामुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी मिरजकर तिकटी येथे दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला. या सर्वच उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र, युथ आयकॉन आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने कृष्णराज महाडिकप्रेमी तसेच धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आज दिवसभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान हारतुरे आणू नका तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा असणारे डिजिटल फलक उभारु नका, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील शिये इथल्या भाजपा पदाधिकार्‍यांच्यावतीने दिव्यांगांसाठी ६ व्हिल चेअर आणि ६ स्टीक आणि अन्य साहित्य देण्यात आले. भागरीथी महिला संस्थेच्या कार्यालयात हे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमर उरुणकर, शिवानी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार, अर्पिता जाधव यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील शिये इथल्या एचआयव्हीग्रस्त मुलांच्या करुणालय या संस्थेत आज कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. या संस्थेतील मुलांना आपल्या पाल्यांप्रमाणे वाढवलेल्या आनंद बनसोडे यांनी करुणालय संस्थेची गरज स्पष्ट केली. तसेच या संस्थेला सढळ हाताने मदत देण्याचे आवाहन केले. भाजपा पदाधिकार्‍यांनी या संस्थेतील मुलांना खाऊचे वाटप केले.
दरम्यान आज दुपारी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी उद्यमनगर इथल्या पांजरपोळ संस्थेत जाऊन अनोखा उपक्रम राबवला. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोल्हापूर महानगर युवा मोर्चाच्यावतीने पांजरपोळ संस्थेतील जनावरांना दोन ट्रॉली चारा देण्यात आला. तसेच किरण शिराळे फौंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने १०० कलिंगडे, २५ डझन अननस, ३० डझन केळी असे खाद्य, सिध्दार्थ शिराळे, वैभव राऊत, ओंकार म्हेतर, अथर्व जाधव, सिध्दांत जिरगे, शिवतेज देसाई, गौरव सरनाईक, तनिष्क पुरवंत, विवेक पाटील यांच्यामार्फत जनावरांना खाऊ घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरक्षणाची शपथ घेतली. रेल्वे स्टेशन तसेच स्टेशन बाहेरील मार्गावरील बस स्टॉप, फुटपाथवरील फिरस्ते, व्यावसायिक यांना छत्री वाटप करण्यात आले. १०० छत्र्या यावेळी गरजूंना देण्यात आल्या. या सर्वच उपक्रमांचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, तलहा मणेर, भूषण कानकेकर, अनिकेत सोलापुरे, पंकज बारड, अभिषेक भोसले, समर्थ चिले, देवयानी पाटील, निरंजन घाडगे, ऋषिराज पाटील, रोहित गोते, इब्राहिम मुजावर, यश उलपे, पृथ्वीराज पुरोहित, योगिराज सुतार उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!