सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रेन बायपास कार्यशाळा संपन्न ; २० न्यूरोसर्जन्स आणि आफ्रिकेतील तज्ञांचा सहभाग ; डॉ.शिवशंकर मरजक्के

 

कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के, मेडिकल डायरेक्टर व प्रमुख न्यूरोसर्जन, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यांच्या नेतृत्वाखाली कणेरीमठ, कोल्हापूर येथे 13-14 जून 2026 रोजी ‘NSI( Neurological society of India ) Microvascular Anastomosis Workshop 2026’ अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाली.परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या शुभहस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या विचारातून सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा, शिक्षण आणि संशोधनाला सातत्याने चालना मिळत आहे.न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातील Neurosurgeon ची शिखर संघटना असून, त्यांच्या विद्यमाने झालेल्या या कार्यशाळेत देशातील विविध राज्यांमधून आलेल्या 20 न्यूरोसर्जन्स सह आफ्रिका खंडातील एका न्यूरोसर्जन ने सहभाग नोंदविला. त्यामुळे या कार्यशाळेला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.उत्कृष्टता हे ठिकाण नाही, ती एक साधना आहे”
ब्रेन बायपास अर्थात मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस ही न्यूरोसर्जरीतील सर्वात क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे. आजवर ती फक्त महानगरांतील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांपुरती मर्यादित होती. अशी माहिती डॉ. मारजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले ही मर्यादा मोडून गावातील धर्मादाय रुग्णालयातही जागतिक दर्जाचे सर्वात क्लिष्ट शस्त्रक्रिया आणि प्रशिक्षण देता येते.

कानेरीमठ येथे डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमने जगातील पहिली, दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून इतिहास रचला. त्या निस्सीम प्रयत्नांची आणि शल्यचिकित्सेच्या कौशल्याची ही कार्यशाळा म्हणजे एक पोचपावती आहे. भारतातील मेंदू तज्ञ शिखर संघटना NSI ने हेच ओळखून आमच्यावर विश्वास ठेवला आणि या प्रतिष्ठित कार्यशाळेचे यजमानपद दिले.गावच्या रुग्णालयाचे जागतिक व्यासपीठात रूपांतर
यातून सिद्ध झाले आहे की, जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन जर समर्पणाने कार्याला पूजतील, तर गावातील धर्मादाय रुग्णालयाच्या मर्यादा मोडून ते जगभरातील न्यूरोसर्जनना शिकवण्याचे व प्रशिक्षण देण्याचे व्यासपीठ बनू शकते.“स्वामीजींचे आशीर्वाद, त्यांचा अढळ पाठिंबा, मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा उभारणीची दृष्टी, तसेच माणुसकी जपणाऱ्या उत्तम टीममुळे माझे हे यश शक्य झाले आहे.

परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘महानगरातील कॉर्पोरेट दर्जाची सेवा गावापर्यंत नेणे आणि न नफा न तोटा तत्त्वावर- निराधारांचा आधार’ या दृष्टीला सिद्धगिरी रुग्णालय व संशोधन केंद्राद्वारे मूर्त रूप मिळाले आहे. डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी सिद्ध केले आहे की, फक्त महानगरांची सेवा नव्हे, तर जगातील सर्वोत्तम सेवा गावात आणता येते, तिथे प्रॅक्टिस करता येते आणि जगातील न्यूरोसर्जनना शिकवता येते.”डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखालीया कार्यशाळेत डॉ. प्रा. द्वारकानाथ श्रीनिवास, माजी विभाग प्रमुख, निम्हान्स बंगळूर आणि डॉ. बटुक दियोरा, विभाग प्रमुख, SION रुग्णालय मुंबई यांच्यासह जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी भारतातील विविध भागांतील न्यूरोसर्जन आणि आफ्रिकेतील प्रतिनिधीला सिलिकॉन ट्यूब व धमनी मॉडेलवर ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.प्रतिनिधींच्या प्रॅक्टिससाठी 18 न्यूरोसर्जरी मायक्रोस्कोप उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रत्येकाला स्वतंत्र मायक्रोस्कोप दिला गेला.ब्रेन बायपास म्हणजे 1 मिलीमीटरपेक्षा कमी व्यासाच्या दोन धमन्या जोडून आजारी धमनीच्या पलीकडे रक्तप्रवाह वळवण्याची प्रक्रिया आहे. ही न्यूरोसर्जन मिळवू शकणाऱ्या सर्वोच्च कौशल्यांपैकी एक आहे. भारतात एकेरी अंकातील म्हणजे फार मोजके न्यूरोसर्जनच ही शस्त्रक्रिया नियमितपणे करतात. डॉ. शिवशंकर मारजक्के आणि त्यांची टीम सध्या भारतात सर्वाधिक अशा शस्त्रक्रिया करत आहे.. यामध्ये मोया-मोया या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारावर करण्यात आलेल्या ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जागतिक ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

देश-विदेशातून आलेल्या न्यूरोसर्जन्सनी या लाईव्ह सर्जरीचे बारकाईने निरीक्षण करत ब्रेन बायपास सर्जरीतील प्रत्येक टप्पा, मायक्रोव्हॅस्क्युलर अॅनास्टोमोसिस तंत्र आणि रिव्हॅस्क्युलरायझेशन प्रक्रियेची सखोल माहिती घेतली. प्रत्यक्ष रुग्णावरील शस्त्रक्रियेचे निरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने सहभागी डॉक्टरांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत केले.ही कार्यशाळा फक्त प्रशिक्षण नव्हती, तर भारतभरातील सहकारी न्यूरोसर्जनसाठी एक प्रेरणा होती. गावात राहून, धर्मादाय तत्त्वावर काम करूनही जागतिक दर्जाची शस्त्रक्रिया आणि जागतिक दर्जाचे शल्यचिकित्सक घडवता येतात, हे डॉ. मारजक्के यांनी सिद्ध केले.

या समर्पित कार्यामुळेच डॉ. शिवशंकर मारजक्के आज क्लिष्ट ब्रेन आणि स्पाइन शस्त्रक्रियांचे जागतिक नेते म्हणून ओळखले जातात. ते ब्रेन बायपास शस्त्रक्रियांसाठी भारतभर आणि परदेशातही राष्ट्रीय विद्याशाखा सदस्य आहेत. भारत आणि जगभर प्रवास करून ते ज्ञान वाटतात. त्यांनी सिद्धगिरी रुग्णालय आणि कोल्हापूरला जगाच्या नकाशावर आणले आहे. डॉ. अंकुश , राजू शिंदे सर्व फॅकल्टी सदस्य, सहभागी न्यूरोसर्जन्स तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सिंग, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!