भारतीय कंपनी सचिव संस्था (ICSI) चा निकाल जाहिर

 

कोल्हापूर: प्रोफेशनल प्रोग्राम आणि एक्झिक्युटिव्हसाठी कंपनी सेक्रेटरी जून २०२६ सत्र साठीचे परीक्षांचे निकाल, आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी घोषित करण्यात आले आहेत. सर्व संबंधितांच्या माहितीसाठी दिल्ली आणि देशभरातील संस्थेच्या सर्व प्रादेशिक आणि अध्याय कार्यालयांना जाहिर केले आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून प्रोफेशनल प्रोग्राम 27 आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम 35 विध्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेत (अभ्यासक्रम – २०२२) ३२.६९ टक्के उमेदवार गट-१ मध्ये आणि २९.४९ टक्के उमेदवार गट-२ मध्ये उत्तीर्ण झाले.एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षेत (अभ्यासक्रम – २०२२) १७.४१ टक्के उमेदवार गट -१ मध्ये आणि २२.१९ टक्के उमेदवार गट -२ मध्ये उत्तीर्ण झाले.आय सी एस आय च्या कोल्हापूर अधिकार क्षेत्रात, प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेत (अभ्यासक्रम – २०२२) ३४.६७ टक्के उमेदवार गट-१ मध्ये आणि ३४.९२ टक्के उमेदवार गट-२ मध्ये उत्तीर्ण झाले आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षेत (अभ्यासक्रम – २०२२) १९.३१टक्के उमेदवार गट -१ मध्ये आणि १९.१९ टक्के उमेदवार गट -२ मध्ये उत्तीर्ण झाले.कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन, सीएस स्वप्नील पाटोळे आणि मॅनॅजमेन्ट कमिटी कडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.आय सी एस आय च्या कोल्हापूर अधिकार क्षेत्रात, एकूण 27 विद्यार्थ्यांनी सी एस प्रोफेशनल प्रोग्राम यशस्वीरित्या उत्तीर्ण केला आहे, तर 35 विद्यार्थ्यांनी सी एस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम उत्तीर्ण केला आहे.

कोल्हापूर चॅप्टर चे अध्यक्ष स्वप्निल पाटोळे म्हणाले ” सर्व यशस्वी उमेदवारांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांना यश मिळो अश्या शुभेच्छा देतो. त्यांची ही कामगिरी केवळ एक वैयक्तिक टप्पाच नाही तर संपूर्ण कोल्हापूर आयसीएसआय चॅप्टरसाठी अभिमानाचा क्षण आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!