शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार; मंगेश चिवटे

 

कोल्हापूर : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीत पुणे आणि कोल्हापूर करिता वैद्यकीय दूत अशी ओळख असणारे मंगेश चिवटे यांनी आपली उमेदवारी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी आज दिली.
एमए, बी एड, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील शिक्षण घेत स्वतःची बौद्धिक आणि सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ केली. दिल्लीच्या गजबजाटात IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वतःची वाटचाल सरु केली.पत्रकारितेत यश मिळवूनही माझे लक्ष मात्र नेहमीच सामान्य जनतेच्या वेदनांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे राहिले.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने मी सांभाळली. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी तब्बल ४५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आणि ५०,००० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले.
सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असलेले मी आजही अहोरात्र गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी झटत आहेत. राजकीय पद, अधिकार किंवा प्रसिद्धीपेक्षा मानवता, करुणा आणि सेवाभाव हेच माझ्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत.
याचबरोबर आरोग्य क्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता शिक्षक वर्गासाठीही व्यापक स्वरुपात कार्य सुरु केले आहे. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, समस्या व हक्क याबाबत मी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत असून, शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे.
शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभआहे, या भूमिकेतून त्यांच्या सन्मान, सुरक्षितता व न्याय्य मागण्यांसाठी मी ठामपणे उभा राहिलो आहे. आणि नेहमी रहाणार असल्याचे ही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शिक्षक, शिक्षण व्यवस्था आणि भावी पिढी यांचे भवितव्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पुणे शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची माझी भूमिका ही सेवा, अनुभव आणि विश्वासावर आधारित आहे. आरोग्य आणि शिक्षण-समाजाच्या या दोन मूलभूत आधारस्तंभांसाठी समर्पित कार्य करणारे संवेदनशील, अभ्यासू आणि जनतेच्या विश्वासास पात्र असे नेतृत्व आहे.
म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो रुग्ण, शिक्षक व सामान्य जनतेसाठी फक्त आरोग्यदूत नसून, शिक्षकांचा विश्वासू आवाज आणि जीवनदायी आशेचे प्रतीक आहे. असेही मंगेश चिवटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रशांत साळुंखे, बाबासाहेब अडसूळ, वैभव शेटे, मिलिंद सनदी, उमेश कल्याणे नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!