खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता’चा प्रीमियर 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी ओरिजिनल्समध्ये ‘अडकित्ता’ची भर पडणार आहे. पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्यातील गुंतागुंत मांडणारी उत्कंठावर्धक आणि भावनिक कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणण्यात येणार आहे.आशुतोष परांडकर दिग्दर्शित आणि मंगेश पवार अँड कंपनी व जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित ‘अडकित्ता’ हा कुटुंबातील नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल तसेच दुसऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी यांमधील भावनिक गुंतागुंतीचा वेध घेणारा कौटुंबिक चित्रपट आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात उत्तम कलाकारांना एका हळुवार आणि भावस्पर्शी कथेसाठी एकत्र आणण्यात आले आहे. रोजच्या जीवनातील अनुभव मांडणाऱ्या कथानकाला भावनांची खोली देणाऱ्या ‘अडकित्ता’मधून मानवी भावनांशी घट्ट नाते राखत प्रेक्षकांना विचार करायला आणि चर्चा करायला प्रवृत्त करणाऱ्या वेगळ्या कथा सादर करण्याची मराठी झी5ची वचनबद्धता आणखी मजबूत करण्यात आली आहे.‘अडकित्ता’चे वेगळेपण हे आधुनिक काळातील पालकत्वाचा आनंद आणि त्यातील आव्हाने मांडणाऱ्या, आपल्या आयुष्याशी नाते सांगणाऱ्या कथेत आहे. प्रसंगानुरूप घडणाऱ्या घटना, भावनिक नाट्य, कौटुंबिक नातेसंबंध आणि मानवी नाती यांचा वेगळा मिलाफ या कथेत पाहायला मिळतो. व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधताना दररोज करावी लागणारी कसरतही या कथेत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांचा आपल्या भूमिकांमधील बारकावे प्रभावीपणे दाखवणारा अभिनय कथेला अधिक समृद्ध करतो. सहानुभूती, समजूतदारपणा, क्षमा आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपण घेत असलेल्या निर्णयांचा वेध घेत ही कथा नात्यांमधील भावनिक गुंतागुंत उलगडते. गोंधळ आणि धावपळीच्या प्रसंगांतही विनोद, माणुसकी आणि नात्यांमधील जिव्हाळा शोधणारी ‘अडकित्ता’ ही एक हृदयस्पर्शी कथा आहे.मंगलची भूमिका साकारणारी सई ताम्हणकर म्हणाली, “गौतम आणि कस्तुरीच्या आयुष्यात अगदी अनपेक्षित वेळी मंगलचा प्रवेश होतो आणि हळूहळू ती त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते.
गौतमची भूमिका साकारणारा सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “आपले आयुष्य कसे जगायचे, हे आपण पूर्णपणे ठरवले आहे, असे गौतमला वाटत असते. मात्र पालकत्वामुळे त्याचे सगळेच गणित बदलते. मला ही व्यक्तिरेखा जवळची वाटली, कारण त्याचा गोंधळ आणि त्याची धडपड ही आपल्या सर्वांच्या परिचयाच्या परिस्थितीतून निर्माण होते. एकीकडे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, तर दुसरीकडे स्वतःचे करिअरही घडवायचे आहे. ‘
कस्तुरीची भूमिका साकारणारी सखी गोखले म्हणाली, “कस्तुरी ही शहरात राहणारी स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. विभक्त कुटुंबात नव्याने आलेले मातृत्व सांभाळताना ती आपल्या महत्त्वाकांक्षाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा संघर्ष अनेकांच्या आयुष्यात दिसतो, मात्र त्याबद्दल फारसे बोलले जात नाही.”
