कंट्रीसाइड अॅडव्हेंचर हॉलीडेज ही लग्झरी टूर ऑपरेटिंग क्षेत्रातील २५ वर्षे जुनी मुंबईस्थित कंपनी कॅरिअन ट्रेल ट्रेक हा ८ दिवसांचा अनोखा ट्रेक आयोजित करत आहे. यामध्ये ५० किलोमीटर्सचे अंतर कापले जाणार आहे तसेच टर्कीमधील काही अप्रतिम स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. हायकिंग आणि वैविध्यपूर्ण स्थळांवर हायकिंगच्या माध्यमातून इतिहासाचा धांडोळा असे स्वरूप असलेल्या या प्रवासाचे पाच विभाग करता येतील. बॉझबुरून द्विपकल्प,डॅट्का द्विपकल्प, गोकोवाचे आखात, कॅरिअन किनारपट्टीमागील प्रदेश आणि मुगला परिसर.आत्तापर्यंतच्या सर्वांत लांब सफरीमध्ये अर्थात कॅरिअन ट्रेल ट्रेकमध्ये पर्यटकांना टर्कीच्या आतापर्यंत फारशा परिचित नसलेल्या, प्राचीन आणि आधुनिक नागरीकरणाचा स्पर्श न झालेल्या अशा अनेक स्थळांचे दर्शन घडेल.नजीकच्या भविष्यकाळात नक्कीच सर्वांच्या परिचयाची होतील अशा या खेड्यांमध्ये एक अतुलनीय सफर घडेल यात शंकाच नाही. किनारपट्टीची मनोरम दृश्ये, पूर्वीचे अवशेष आणि देखणा निसर्ग हे सगळे अवाक करून टाकणारे आहे. हायकिंग तसे मध्यम स्वरूपाचे असल्याने फारसा शारीरिक थकवा जाणवत नाही. त्यामुळे हा ट्रेक सर्व वयोगटांतील लोक करू शकतात.किमान सहा जणांच्या समूहासाठी असलेल्या या साहसी सहलीचे दर केवळ १,०३,८६३ रुपयांपासून सुरू होत आहेत.
भूमध्यसागरी प्रदेशातील नयनरम्य जलाशय, भरगच्च टर्की खाद्यपदार्थ, वैविध्यपूर्ण वनस्पती-प्राण्यांच्या जगात डोकावण्याची संधी देणारी गोकोवाच्या आखाताची अस्पर्शित किनारपट्टी,कॅरिआ प्रदेशातील ऐतिहासिक अवशेषांचा शोध आणि मुगला प्रांतातील नैसर्गिक स्थळांचे दर्शन असा हा कॅरिआ ट्रेलचा ट्रेक इतिहास आणि भूगोलाच्या विविध घटकांची अनुभूती निसर्गाच्या सान्निध्यात देतो.हा अनुभव पर्यटकांना केवळ निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जात नाही, तर स्वत:च्या शोधालाही प्रवृत्त करतो. निसर्गप्रेमींना आवडेल अशी ही कॅरिअन ट्रेल ट्रेक नावाची शांत सफर अलोट आनंद, शांतता घेऊन येईल आणि पर्यटकांच्या मनात असंख्य स्मृती कोरून ठेवेल.
कंट्रीसाइड अॅडव्हेंचर हॉलीडेजचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद भिडे म्हणतात, “आम्ही साहसाकडे बघतो ते अॅड्रेनलिनचा स्राव शांतता व पावित्र्याने संतुलित करणे या दृष्टीने. अशा सफरींमध्ये प्रत्येक उपक्रमानंतर एक प्रकारचा आराम मिळावा अशा दृष्टीनेच आम्ही सर्व आखणी करतो. मौजमजा, निवांतपणा यांच्यासोबत प्रत्येक ट्रेकरला समाधानाची भावना यावी अशी आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचा प्रवास अविस्मरणीय व प्रेरणादायी करण्यासाठी काही अधिक प्रयत्न करतो.”
६ एप्रिल २०१९ रोजी सुरू होणाऱ्या व १३ एप्रिल २०१९ रोजी समाप्त होणाऱ्या या ट्रेकसाठी बुकिंग सुरू झाले आहे. या प्रवासाबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याwww.countrysideindia.com या वेबसाइटला भेट द्या.
Leave a Reply