
मुंबई : कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधील छोट्या सुरविरांनी अवघ्या महाराष्ट्राला तब्बल सहा महिने त्यांच्या निखळ, निरागस स्वरांनी एकत्र बांधून ठेवले. सहा महिन्यांपूर्वी २१ छोट्या सुरवीरांसोबत सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार -स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर. याचसहा स्पर्धकांमध्ये रंगला सुर्वण कट्यार मिळवण्यासाठी सुरांचा महासंग्राम. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये रंगली गाण्यांची मैफल आणि महाराष्ट्राला मिळाला नवीन छोटससुरवीर… गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या हस्ते विजेत्याला देण्यात आली सुवर्ण कट्यार. स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला. स्वराली जाधवला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा USA टूर – ज्यामध्ये युनिवर्सल स्टुडीओज आणि डिझनीलैंड बरोबर मनोरंजन आणिऍडव्हेंचर थीम पार्क बघण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. तर पाच छोट्या सुरवीरांसोबत मॉनिटरला देखील कलर्स मराठी तर्फे एक लाखाचा धनादेश आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल हिमाचल प्रदेशचा दौरा ही विशेष भेट मिळाली
Leave a Reply