जिओने महाराष्ट्रातील 3 कोटी मोबाइल वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला पुन्हा एकदा रिलायन्स जिओने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला.. जानेवारी २०२० मध्ये ऑपरेटरने उर्वरित महाराष्ट्रात (मुंबई वगळता) 3 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली. 3 कोटींचा टप्पा गाठणारा महाराष्ट्र हे पहिले जिओ राज्य आहे. दूरसंचार नियामक, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जाहीर केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२० च्या अखेरीस महाराष्ट्रात 7.75 लाख मोबाइल वापरकर्त्यांची वाढ झाली आहे.सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक 6.33 लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर बीएसएनएल 1.22 लाख आणि भारती एअरटेलच 1.15 लाख वापरकर्त्यांसह वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाने 1.26 लाख वापरकर्त्यांची नकारात्मक घट नोंदविली आहे. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.95 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर जिओ 3.05 कोटी ग्राहक, भारती एअरटेल 1.6 कोटी आणि बीएसएनएल 72 लाख ग्राहक आहेत.डिसेंबर 2019 मध्ये असलेल्या 9.26 कोटी सबस्कायबर्स मध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून 7.76 लाखाची भर पडली असून जानेवारीमध्ये स्बस्क्राइबर्स 9.33 कोटीवर पोहोचले आहेत.जानेवारी महिन्यात, केवळ जिओ आणि बीएसएनएलमध्ये डिसेंबर 2019 च्या तुलनेत 2% पेक्षा जास्त वाढ झाली आहे एअरटेलची वाढ 1% पेक्षा […]