वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार

 

 

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मावळ्यांचे प्रभावी संघटन केले आणि हे राज्य व्हावेही श्रींची इच्छा’, अशा श्रद्धेने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलीत्याचप्रमाणे संघटनासंप्रदायजात आदींचे बंध दूर सारून हिंदूसंघटन करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्यानिर्मितीसाठी घटस्थापनेच्या शुभदिनीम्हणजेच आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा, 7 ऑक्टोबर 2002 या दिवशी महाराष्ट्रातील चिपळूण (जिल्हा रत्नागिरीयेथे हिंदु जनजागृती समितीची उत्स्फूर्तपणे मुहूर्तमेढ रोवली गेली.आज समिती धर्मशिक्षणधर्मजागृतीधर्मरक्षणराष्ट्ररक्षण आणि सामाजिक साहाय्य या पंचसूत्रीच्या आधारे देशभरात कार्यरत आहे. ‘हिंदु राष्ट्राचा उद्घोष देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोेचवण्यात समितीचा सिंहाचा वाटा आहेसमितीचे शेकडो कार्यकर्तेधर्मप्रेमीतसेच समितीशी जोडलेले हिंदुत्वनिष्ठ नेते ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून आणि साधना म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.

1. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म कार्य ! अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनतसेच जिल्हाप्रांत आणि राज्यस्तरीय अधिवेशने : ‘हिंदु धर्मावर होणार्‍या सर्व आघातांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच अंतिम उत्तर आहे’, हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करून वर्ष 2012 पासून आतापर्यंत नऊ अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली आहेतयंदा दळणवळण बंदीच्या काळात नववे अधिवेशन ऑनलाईन’ पद्धतीने पार पडलेआतापर्यंत जिल्हास्तरीय 43, प्रांतीय 58, तर राज्यस्तरीय 12 अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहेयातून देशविदेशांतील 250 हून अधिक हिंदू संघटना हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील झाल्या आहेत.

.राष्ट्रीय हिंदू आंदोलन आजदेशात हिंदु धर्मधर्मग्रंथसंतराष्ट्रपुरुष यांच्यावरील आघातांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी समितीच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन प्रत्येक महिन्यात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतातया आंदोलनांचे वैशिष्ट्य म्हणजे ही आंदोलने देशातील अनेक शहरांमध्ये एकाच दिवशी करण्यातयेतात.आजपर्यंत विविध विषयांवर हजार 707 राष्ट्रीय हिंदू आंदोलने झाली आहेतदळणवळण बंदीच्या काळात ही आंदोलने ऑनलाईन’ माध्यमातून चालू आहेतचीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भातील समितीच्या आंदोलनात जगभरातील अनेक देशांतील भारतप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

हिंदु राष्ट्र जागृती सभा आणि धर्मजागृतीपर प्रदर्शने हिंदु जनजागृती समितीने देशातील अनेक राज्यांमध्ये ठिकठिकाणीजिल्हातालुका आणि गावस्तरावर हजार 896 हिंदु राष्ट्र जागृती सभांचे यशस्वी आयोजन केलेया सभांमुळे 19 लाख 23 हजार लोकांपर्यंत हिंदु राष्ट्राचा विषय जाऊन गावागावांतील हिंदू संघटित झाले आहेतअनेक गावांतील युवकांनी साधना चालू केलीते धर्माचरणी बनलेअनेकांचे व्यसन सुटलेेतसेच त्यांचे आपापसांतील मतभेद दूर झाले आहेत.या सभांच्या वेळीतसेच कुंभमेळावर्षभरात विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंतीपुण्यतिथीच्या वेळी देशभरात समितीच्या वतीने काश्मिरी हिंदूंचे रक्षण’, ‘बांगलादेशी हिंदूंची दुःस्थिती’, ‘धर्मशिक्षण’, ‘धर्मरक्षण’, ‘राष्ट्ररक्षण’, ‘हिंदु राष्ट्र’, ‘क्रांतीपुरुषांचे स्मरण’ ‘गंगारक्षण’, ‘गोरक्षण’, ‘भोंदू साधू’ इत्यादी विषयांवर धर्मजागृतीपर प्रदर्शने लावण्यात येतात.

धर्मशिक्षणवर्ग हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव लक्षात घेऊन समिती धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन करतेदळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊनच्याकाळातही धर्मशिक्षण वर्ग ऑनलाईन’ माध्यमातून चालू असून आजमितीस एकूण 322 ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग चालू आहेत.

.देवतांचे विडंबन रोखणे नाटकेविज्ञापनेचित्रपटवेष्टने इत्यादींच्या माध्यमातून होणार्‍या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या शेकडो प्रकरणांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने वैध मार्गाने आवाज उठवलात्यामुळे अनेक प्रकरणांत (उदाहिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्हुसेन यांनी अश्‍लाघ्य स्वरूपात रेखाटलेली देवतांची चित्रे, ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटातील देवतांचे विडंबनदेवतांचे विडंबन थांबवण्यात समितीला यश प्राप्त झाले आहे. ‘दबंग’ या चित्रपटात हिंदु साधूंसंतांना गॉगल लावून गिटार वाजवत नाचतांना दाखवण्यात आले होतेसमितीने केलेल्या विरोधानंतर दबंग चित्रपटातील हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात आलीसमितीने केलेल्या विरोधानंतर नवरात्रीमध्ये प्रदर्शित झालेल्या लव्हरात्री’ या चित्रपटाचे नाव पालटण्यात आलेसमितीकडून देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आजही अथकपणे आवाज उठवणे चालू आहेआजपर्यंत समितीने देवतांच्या विडंबनाच्या विविध क्षेत्रांतील विविध प्रकारच्या 400 हून अधिक घटना वैध मार्गाने रोखल्या आहेत !

. ‘जागो हिंदू’ संदेश समिती प्रतिदिन समाजराष्ट्र्र अन् धर्म यांवरील आघातांचे वृत्त आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जागो हिंदू’ संदेशाच्या माध्यमातून 10 लाखांहून अधिक हिंदूंपर्यंत पोहोचवते.

सुराज्य अभियानआरोग्य साहाय्य समिती आणि प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रम समितीने सामाजिक दुष्प्रवृत्तींविरूद्ध संविधानिक मार्गाने संघर्ष करण्यासाठी सुराज्य अभियान’ आरंभलेया माध्यमातून शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात संवैधानिक मार्गाने लढा देणे आणि जनमानसांत जागृती करणे चालू आहे. यासह आरोग्य साहाय्य समिती या उपक्रमाच्या अंतर्गत महानगरपालिकेतील भ्रष्टाचारतसेच इंधन अन् अन्न यांतील भेसळ आदींविषयी आवाज उठवत आहेसमितीने अधिक दराने वसुली करणारी रुग्णालयेतसेच उद्योगकारखाने यांमुळे होणार्‍या जलप्रदुषण आदी विषयांच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर तक्रारी केल्या असून त्याचा पाठपुरावा चालू आहेसमाजसाहाय्याच्या दृष्टीकोनातून समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रम राबवला जातोआजमितीस समितीच्या वतीने 143 प्रथोमपचार प्रशिक्षण वर्ग चालू आहेत.

स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि शौर्य जागरण उपक्रम खूनदरोडेबलात्कारखंडणी अशांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकणे काळाची आवश्यकता आहेयासाठी समितीच्या माध्यमातून विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि शौर्य जागरण उपक्रम राबवले जातातसध्या दळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊनच्याकाळात 70 स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग ऑनलाईन’ स्तरावर चालू आहेत.

उद्योगपती आणि पत्रकार यांचे संघटन उद्योगपती परिषद’ हे राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ व्यावसायिकव्यापारी अन् उद्योगपती यांचे संघटन आहेयाच प्रकारे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत राष्ट्रधर्म प्रेमी पत्रकारांच्या राष्ट्रीय पत्रकार मंचची स्थापना झालेली आहेया माध्यमातून राष्ट्रधर्म यांच्याशी संबंधित विषयावरील बातम्यालेख आदींना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जातेधर्मावरील टीकांचे खंडण केले जाते.

ग्रंथसंपदा हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने विविध ग्रंथांचे संकलन केले आहेयात समिती पुरस्कृत हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘गोसंवर्धन’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर आणि धर्मांतरितांचे शुद्धीकरण, ‘देवनदी गंगेचे रक्षण करा !’, ‘भोंदू बाबांपासून सावधान !’ ‘हिंदु राष्ट्र ः आक्षेप आणि खंडण’ इत्यादी ग्रंथांचा समावेश आहेयांमुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक सुस्पष्टता निर्माण होण्यास साहाय्य झाले.

अंराष्ट्ररक्षणसंस्कृतीरक्षण आणि समाजसाहाय्याचे कार्य भारताच्या नकाशाच्या विद्रुपीकरणाला सनदशीर मार्गाने विरोध करणेराष्ट्रगीताचातसेच राष्ट्रध्वजाचा मान राखा’, ही प्रबोधनपर चळवळ राबवणेपाठ्यपुस्तकांतून होणारा राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि परकीय मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण यांविरोधात समितीने वैध आंदोलने केली गेलीत्यामुळे केंद्रशासनाच्या एन्सीईआर्टी’ (NCERT), तसेच गोवा शासन यांना मोगलांचा इतिहास कमी करून शिवाजी महाराजांचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करावा लागला.

31 डिसेंबरला नववर्ष साजरे करणेतसेच व्हॅलेंटाईन डे’, फ्रेंडशिप डे’, अशी डे’ साजरा करण्याच्या कुप्रथांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे जनप्रबोधन करत आहेया समवेतच हिंदु संस्कृतीनुसार आचारपालन करण्याविषयी (उदास्नानवेशभूषाआहार इत्यादीसमितीकडून मार्गदर्शन करण्यात येते.

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतारक्तदान शिबिरेपूरग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना प्रत्यक्ष साहाय्य करणेविविध कुंभमेळेतसेच गावोगावी भरवण्यात येणार्‍या जत्रांच्या सुनियोजनाचे कार्य करणेधूळवड आणि रंगपंचमी या दिवशी पुण्यात गेली 18 वर्षे खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ राबवून हा जलाशय प्रदूषित होण्यापावून वाचवणेवृक्षारोपण करणे आदी समाजसाहाय्याची कार्येही केली जातात.

लव्ह जिहाद आणि हलाल प्रमाणपत्र’ यांविषयी जागृती : समिती वर्ष 2009 पासून लव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती करत असून पत्रकार परिषदव्याख्यानेसभा घेतल्या आहेतमराठीहिंदीइंग्रजीकन्नडतसेच अन्य भारतीय भाषेत लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहेमहिलांवरील अत्याचारांच्या विरोधात रणरागिणी’ या महिला शाखेची स्थापना करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने गेल्या काही मासांपासून समांतर अर्थव्यवस्था असलेल्या आणि आर्थिक जिहादाप्रमाणे असलेल्या हलाल प्रमाणपत्राविषयी विविध चर्चासत्रशासनाला निवेदने आणि व्यापार्‍यांच्या बैठका यांच्या माध्यमातून जागृती केली जात आहेयामुळे अनेक राज्यांत हजारो व्यावसायिक जागृत आणि संघटित झाले आहेत. तसेच आतंकवादाची शिकवण देणारा हिंदुद्वेषी झाकीर नाईक याच्यावर कारवाई करावीही मागणी समितीने लावून धरलीयाची दखल घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांनी झाकीर नाईकचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध शोधले आणि केंद्र सरकारने त्याच्या संघटनेवरच बंदी घातलीतसेच त्यांच्या पीस टी.व्ही.चे भारतातील अवैध प्रसारण बंद केले.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात जागृती सुव्यवस्थापनाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण निधर्मी सरकारांनी केलेमात्र प्रत्यक्षात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची शेकडो एकर भूमीकोट्यवधी रुपयांचे दागदागिनेअन्य संपत्ती यांची मोठ्या प्रमाणावर सरकारकडून लूट चालू आहेधार्मिक प्रथापरंपरा बंद पाडल्या जात आहेतअनेक मंदिरातील घोटाळे माहितीच्या अधिकारात उघड करून त्याविरोधात महाराष्ट्रकर्नाटकआंध प्रदेश आणि अन्य राज्यांत जनआंदोलन करून समितीने देशभर राष्ट्रीय मंदिरसंस्कृती रक्षा अभियान’ राबवले आहे.

हिंदु धर्मावर आघात करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध समितीने 10 वर्षे महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारले.परिणामीअंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील 27 पैकी 16 हिंदुविरोधी कलमे रहित करून कायदा करण्यात आला.

2.सामाजिक प्रसारमाध्यमांतून विश्‍वव्यापी हिंदूसंघटन! : हिंदूंच्या हक्काचे व्यासपीठ बनलेले समितीचे www.HinduJagruti.Org हे संकेतस्थळ आज मराठीहिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कार्यरत आहेप्रतिममहिना जगभरातील लाखांहून अधिक वाचक या संकेतस्थळाला भेट देतातसंकेतस्थळामुळे 48 हजारांहून अधिक लोक धर्मकार्याश जोडले गेले आहेतसमितीच्या youtube.com/HinduJagruti या यूट्युब चॅनलला हिंदूंचा भरघोस प्रतिसाद असून आजपर्यंत 61 लाखांहून अधिक लोकांनी त्यास भेट दिली आहेसमितीच्या facebook.com/HinduAdhiveshan या अधिकृत फेसबूकशी 14 लाख 50 हजार जण जोडले गेले समितीच्या twitter.com/HinduJagrutiOrg या ट्विटर खात्याचे 45 हजार फॉलोवर्स’ आहेतया माध्यमातून जगभर जागृतीचे कार्य चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!