Information

सातारा – कागल महामार्गाचे सहापदरीकरण,तर बहुचर्चित बास्केट ब्रीजही साकारणार, खासदार धनंजय महाडिक

August 4, 2022 0

दिल्ली:केंद्रीयभूपृष्ठ वाहतुक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धनंजय महाडिक उपस्थित होते. नामदार गडकरी यांनी राज्यातील नव्या महामार्गांच्या बांधणीचा आढावा घेतला. या बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी, सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडले असल्याबद्दल लक्ष वेधले. सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महामार्गाचे सहापदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यावर नामदार गडकरी यांनी, खासदार महाडिक यांना सविस्तर माहिती दिली. सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १२ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रूपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान प्रत्यक्ष सुरवात होईल, असे नामदार गडकरी यांनी सांगितले. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर होणारा बास्केट ब्रीज, याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. त्यामुळे बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हा बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहील. तसेच शिरोली नाक्याकडून कोल्हापूरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नामदार गडकरी यांनी, सातारा ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरणावर आपले पूर्ण लक्ष असल्याचे सांगितले. शिवाय खासदार महाडिक यांचाही पाठपुरावा असल्याने, हे काम वेळेत आणि वेगाने पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.   

News

पावसामुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा : आमदार जयश्री जाधव

August 4, 2022 0

कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर […]

News

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर  असंभव:आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास        

August 4, 2022 0

कोल्हापूर:राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.  बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर इलेट्रॉनिक […]

Information

हर घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी सहाभागी व्हावे: कृष्णराज महाडिक

August 4, 2022 0

कोल्हापूर :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहना नुसार सर्वांनी हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी व्हावे,असे प्रतिपादन रेसर,युटयूबर श्री.कृष्णराज महाडिक यांनी केले.रोट्रेक्ट क्लब ऑफ के.आय.टी सनशाईन या क्लबच्या पदग्रहण समारंभात […]

News

कोल्हापुरात १२ व १३ सप्टेंबर रोजी भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन

August 2, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत […]

News

गोकुळ कडून म्‍हैस दूध २ रुपये व गाय दूध १ रुपये दुधखरेदी दरात वाढ:अध्‍यक्ष विश्वास पाटील                                  

July 30, 2022 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक ०१/०८/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. त्‍यास […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आयोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

July 29, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर जिल्हा हा वैविध्यतने संपन्न असा जिल्हा आहे.शिवाय कोल्हापूर ही कलानगरी शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीला कलेचा वारसा लाभलेला आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीतील […]

Entertainment

दे धक्का २’ ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार

July 29, 2022 0

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप […]

Information

रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न

July 26, 2022 0

कोल्हापुर: गेली 7 वर्ष समाजातील तृतीयपंथी समाजाला सोबत घेऊन,समान वागणूक देऊन रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या क्लबचे सुरु असलेले समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे सौ.मोश्मी आवाडे यांनी सांगितले.रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर […]

News

खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू : मुख्यमंत्री

July 25, 2022 0

कोल्हापूर  : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता सहाही जिल्ह्यातील […]

1 14 15 16 17 18 46
error: Content is protected !!