ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. सोबतच वेळोवेळी ते विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिकाही मांडत असतात.खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात. आजही खेर यांनी असाच एक लहानसा पण मार्मिक व्हीडिओ ‘कू’वर टाकला आहे. या व्हीडिओत म्हटले आहे,’सगळी परिस्थिती चांगली, अनुकूल झाल्यावर मी दु:खी होण्याचे सोडून देईन, आनंदी राहीन असा विचार सोडून द्या. तुम्ही आनंदी झालात तरच परिस्थिती चांगली, अनुकूल बनेल. समस्या सुटतील’खेर यांच्या या व्हीडिओला भरभरून लाइक्स मिळत असून लोक तो शेअरही करत आहेत. Check this post from @anupampkher on Koo App: “सच्चाई..:) ” https://www.kooapp.com/koo/anupampkher/764e29e2-b032-47e0-a188-5464f2507708 Download Koo App https://www.kooapp.com/dnld