
कोल्हापूर: शिवाजी चौक येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सभोवती असणाऱ्या लोखंडी ग्रील ला रात्री एका ट्रकने धडक दिल्याने ग्रील संपूर्ण तुटले.चार दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी चौक येथील लोखंडी ग्रिलला वाहन धडकले होते म्हणून प्रशासन सोबत बैठक घेऊन काही मागण्या सांगितल्या होत्या ,तसेच ठेकेदाराला तातडीने संपूर्ण स्मारकाभोवती दगड लावण्यास सांगितले होते.पण काम रेंगाळले आणि ट्रकने स्मारकास धडक दिल्याने नुकसान झाले. ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. मात्र आजच्या आज दिवसभरात प्रशासनाकडून सीपीआर कडून येणारी अवजड वाहतूक बंद नाही झाली आणि दगड स्मारका भोवती लागले नाहीत तर मंगळवारी छत्रपती शिवाजी चौकात समस्त_हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.असे महेश उरसाल यांनी सांगितले आहे.
Leave a Reply