
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या लक्षतिर्थ वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्या मंदिर व नाळे कॉलनी येथील विमल इंग्लिश हायस्कूल यांच्यावतीने आज प्लॅस्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यानी प्लास्टिक हटाव पर्यावरण बचाव, प्लॅस्टिकचा धोका युध्दापेक्षा मोठा अशा घोषणा देत प्लॉस्टिक मुक्तीसाठी प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यानी हातामध्ये कापडी पिशव्या घेत कॅरीबॅगचा वापर टाळा असा संदेश दिला.त्याचप्रमाणे आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्लॉस्टिक मुक्त कोल्हापूर होणेसाठी सकाळी फिरायला येणा-या नागरीकांचे प्रबोधन केले. यावेळी ताराबाई गार्डन येथील हॅपीनेस योगा थेरपी मधील सर्व सभासदाना व फिरायला येणा-या नागरीकांना घेऊन प्लॅस्टिक मुक्त कोल्हापूर व स्वच्छता याबाबत शपथ दिली.
Leave a Reply