
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ऋतुराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यां समवेत ऋतुराज पाटील सायकल चालवत अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.तंदुरुस्त कोल्हापूर आणि प्रदूषण मुक्त कोल्हापूर हा संदेश आज युवा पिढीला मिळावा म्हणून सायकलवरून येऊन अर्ज दाखल केल्याचे ऋतुराज पाटील यांनी सांगितले. दक्षिण मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.बेरोजगारी,मंदी,शेतक ऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी सतेज पाटील, प्रतिमा पाटील,सरलाताई पाटील,आर.के.पोवार आदी उपस्थित होते.
Leave a Reply