
लिंगनूर:आमदार हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरीब दिनदलितांच्या संकटाला धावून जाणारा देवदूतच आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर यांनी केले. यामुळेच अडल्यानडलेल्यांसह उपेक्षित व पददलितांना ते आपलेसेच वाटतात.लिंगनुर येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच निजाम मुल्लानी होते.आमदार हसन मुश्रीफ पुढे म्हणाले राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागणवाडी व आंबेहोळ हे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्प रखडले. गडिंग्लज उत्तूर विभागाला वरदायिनी ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रसंगी विधिमंडळाच्या पायऱ्यावर अनेकदा आंदोलन केले. त्यामुळेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे सुधारित पॅकेज मंजूर झाले.श्रीकांत साळुंखे म्हणाले, प्रचंड वादळ-वार्यात आणि उधाणलेल्या समुद्रात राष्ट्रवादीची ही नौका पैलतिरी नेणारा खलाशी म्हणजे आमदार हसन मुश्रीफ आहेत.कार्यक्रमास हारून सय्यद, अशोकराव कुरळे, दत्तात्रय येसरे, महादेव शिंदे, विजय भुरगुडा, दिपक राजगोळे, मोहन चोथे, तमाण्णा भुरगुडा, सुनील शिंदे, भीमराव कांबळे, काशिनाथ कांबळे, सुरेश कुराडे, सुरेंद्र खांडेकर, गौतम पाटील, पिंटू शिंदे, महावीर कमते उपस्थित होते.सौ.वंदना दळवी म्हणाल्याअनंत अडचणी घेऊन लोक आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे येत असतात. यावर आमदार श्री. मुश्रीफ तत्परतेने या सर्वच अडचणी लीलया सोडवतात. त्यांचे हे काम म्हणजे समस्या अनेक उपाय एक असेच आहे
Leave a Reply